Stock Market Closing Bell | सेन्सेक्स, निफ्टी तेजीत बंद, BSE मिडकॅप, स्मॉलकॅपमध्येही वाढ

बीएसई आणि एनएसई
बीएसई आणि एनएसई
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या घसरणीला शुक्रवारी (दि.१०) ब्रेक लागला. सेन्सेक्स २६० अंकांनी वाढून ७२,६६४ वर बंद झाला. तर निफ्टी ९७ अंकांच्या वाढीसह २२,०५५ वर स्थिरावला. एकूणच बाजारात आज संमिश्र व्यवहार दिसून आला.

गुरुवारी सेन्सेक्स १,०६२ अंकांच्या घसरणीसह ७२,४०४ वर बंद झाला होता. तर निफ्टी ३४५ अंकांनी घसरून २१,९५७ वर स्थिरावला होता. दरम्यान, कालच्या घसरणीतून आज सेन्सेक्स आणि निफ्टी सावरले आणि ते वधारुन बंद झाले.

बाजार भांडवलात ३.२८ लाख कोटींनी वाढ

दरम्यान, आज १० मे रोजी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३९६.६२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. ९ मे रोजी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३९३.३४ लाख कोटी रुपये होते. याचाच अर्थ बीएसई सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात ३.२८ लाख कोटींनी वाढ झाली.

जागतिक सकारात्मक संकेतांदरम्यान शेअर बाजाराने आज तेजीत सुरुवात केली होती. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ५०० अंकांनी वाढून ७२,९00 जवळ गेला. तर निफ्टी १५० अंकांनी वाढून २२,१०० हजारांवर व्यवहार केला. त्यानंतर ही तेजी कमी झाली.

निफ्टी मेटल तेजीत

क्षेत्रीय निर्देशांकात निफ्टी मेटल १.५ टक्क्यांनी वाढला. त्यानंतर एफएमसीजी, ऑटो, फार्मा हे प्रत्येकी १ टक्क्यानी वाढले. निफ्टी आयटी ०.८ टक्के घसरणीसह बंद झाला. निफ्टी रियल्टी, निफ्टी PSU Bank हे अनुक्रमे ०.४ टक्के आणि ०.३ टक्क्यांनी घसरले. दरम्यान, दरम्यान, बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप प्रत्येकी ०.८ टक्क्यांनी बंद झाले.

टॉप गेनर्स शेअर्स कोणते?

सेन्सेक्स गुरुवारी ७२,४०४ वर बंद झाला होता. त्यानंतर शुक्रवारी तो ७२,४७५ वर खुला झाला. आजच्या ट्रेडिंग सत्रात तो ७२,९४६ पर्यंत वाढला. त्यानंतर तो ७२,७०० जवळ स्थिरावला. सेन्सेक्सवर एनटीपीसी, पॉवर ग्रिड, जेएसडब्ल्यू स्टील, एशियन पेंट्स, भारती एअरटेल, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा मोटर्स, टायटन, बजाज फायनान्स, रिलायन्स हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी वाढले. तर टीसीएस, इन्फोसिस, एम अँड एम, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

sensex closing
sensex closing

निफ्टीवर बीपीसीएल, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, हिरो मोटोकॉर्प, जेएसडब्ल्यू स्टील हे टॉप गेनर्स होते. हे शेअर्स २ ते ४.५ टक्क्यांपर्यंत वाढले. तर टीसीएस, सिप्ला, LTIMindtree, इन्फोसिस, एम अँड एम हे शेअर्स प्रत्येकी १ टक्क्यानी घसरले.

Paytm चा शेअर्सला लागलं अप्पर सर्किट

दरम्यान, पेटीएमची मूळ कंपनी One97 Communications च्या शेअर्सला आज अप्पर सर्किट लागले. एनएसईवर हा शेअर्स ५ टक्क्यांनी वाढून ३४९ रुपयांवर गेला. गेल्या दोन दिवसांत हा शेअर्स सुमारे १० टक्क्यांनी वाढला आहे. बुधवारपर्यंत सलग १० सत्रांमध्ये शेअर घसरला होता.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news