Stock Market
Stock Market

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स १६७ अंकांनी वाढून बंद, येस बँक, Zomato शेअर्स तेजीत, जाणून घ्या अधिक

Published on

पुढारी ऑनलाईन : जागतिक कमकुवत संकेतांदरम्यान शुक्रवारी शेअर बाजारात अस्थिर वातावरण राहिले. पण सुस्त सुरुवातीनंतर दुपारच्या व्यवहारात बाजारात काही प्रमाणात खरेदी दिसून आली. सेन्सेक्स १६७ अंकांनी वाढून ७१,५९५ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ६४ अंकांच्या वाढीसह २१,७८२ वर स्थिरावला. विशेषतः आज मिडकॅप आणि स्मॉल कॅप क्षेत्रात विक्रीवर जोर राहिला. पण बँकिंग आणि FMCG क्षेत्रातील खरेदीमुळे बाजाराला सपोर्ट मिळाला. बीएसई मिडकॅप ०.८२ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक १.३६ टक्क्यांनी घसरला. (Stock Market Closing Bell)

क्षेत्रीय आघाडीवर ऑटो, कॅपिटल गुड्स, ऑईल आणि गॅस, मेटल, पॉवर आणि रियल्टी प्रत्येकी ०.५- २ टक्क्यांनी घसरले. तर PSU बँक आणि फार्मा निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वाढले.

 संबंधित बातम्या 

सेन्सेक्सवर एसबीआय, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, टायटन हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर एम अँड एम, एनटीपीसी, भारती एअरटेल, टाटा स्टील, इन्फोसिस, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स हे टॉप लूजर्स होते.

निफ्टीवर ग्रासीम, एसबीआय, अपोलो हॉस्पिटल, सन फार्मा, आयसीआयसीय बँक हे शेअर्स २ ते ५ टक्क्यांदरम्यान वाढले. तर ओएनजीसी, एम अँड एम, यूपीएल, एनटीपीसी, हिंदाल्को हे घसरले.

दरम्यान, आरबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेतल्याने पेटीएमच्या शेअर्समध्ये आज पुन्हा ६ टक्क्यांची घसरण झाली

येस बँकेचे शेअर्स पुन्हा वाढले

येस बँकेचे शेअर्स आज ३२ रुपयांपर्यंत गेला होता. हा या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. त्यानंतर तो ३ टक्क्यांच्या वाढीसह ३० रुपयांवर स्थिरावला. (YES Bank Share Price) आरबीआयने एचडीएफसी बँकेला येस बँकेतील हिस्सेदारी वाढवून ९.५० टक्के करण्यास मंजुरी दिली आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत YES बँकेत एसबीआयची २६.१३ टक्के, एचडीएफसी लिमिटेडकडे ३ टक्के आणि आयसीआयसीआय बँकेकडे २.६१ टक्के हिस्सेदारी होती.

झोमॅटोचे शेअर्स तेजीत

डिसेंबर २०२३ तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केल्यानंतर Zomato Ltd चे शेअर्स आजच्या ट्रेडिंग सत्रात वाढून १५१.४५ रुपयांच्या नव्या उच्चांकावर पोहोचले होते. दरम्यान, दुपारच्या व्यवहारात झोमॅटोचे शेअर्स ४.५ टक्के वाढीसह १४८ रुपयांवर होता. (Zomato Share Price) Zomato ने डिसेंबर २०२३ च्या तिमाहीत १३८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवत नफ्यात २८३ टक्क्यांची वाढ नोंदवली. मागील वर्षी याच कालावधीत त्यांचा निव्वळ नफा ३६ कोटी रुपये होता. फूड डिलिव्हरी करणाऱ्या या कंपनीला वर्षभरापूर्वी ३४७ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

कच्च्या तेलाचे दर वाढले, तेल कंपन्यांचे शेअर्स घसरले

आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने तेल विपणन कंपन्यांचे (OMCs) शेअर्स शुक्रवारी ८ टक्क्यांपर्यंत घसरले. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) मध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. आजच्या ट्रेडिंग सत्रात NSE वर हा शेअर्स ८ टक्क्यांनी घसरून १७७.७५ रुपयांच्या निचांकी पातळीवर आला होता. त्यानंतर दुपारच्या व्यवहारात तो ५ टक्के घसरणीसह १८२ रुपयांवर राहिला. (Indian Oil Corporation Share Price) त्यापाठोपाठ हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) यांचेही शेअर्स घसरले. इस्रायलने युद्धविराम प्रस्ताव नाकारल्याने पश्चिम आशियात तणाव वाढण्याची भीती आणि इराक आणि सीरियामधील दहशतवादी ठिकाणांवरील अमेरिकेच्या हल्ल्यांचा तेलाच्या किमतींवर परिणाम झाला आहे. इस्त्रायलने दक्षिण सीमेवरील रफाह शहरावर बॉम्बफेक केल्यानंतर गुरुवारी कच्च्या तेल्चाया दरात ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. (Stock Market Closing Bell)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news