Sensex Nifty Closing Bell | सेन्सेक्स १६५ अंकांनी वाढून बंद, निफ्टी सपाट

Sensex
Sensex
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारात आज (दि.१२) जोरदार ॲक्शन दिसून आली. आजच्या अस्थिर सत्रात एकूणच संमिश्र परिस्थिती राहिली. सेन्सेक्स १६५ अंकांनी वाढून ७३,६६७ वर बंद झाला. तर निफ्टी २२,३३५ वर सपाट झाला. (Sensex Nifty Closing Bell) क्षेत्रीय पातळीवर, आयटी वगळता इतर सर्व निर्देशांक लाल चिन्हात बंद झाले. रियल्टी निर्देशांक जवळपास ३.३ टक्क्यांनी घसरला. पीएसयू बँक आणि मीडिया निर्देशांक प्रत्येकी २ टक्क्यांनी घसरले. तर कॅपिटल गुड्स, एफएमसीजी, हेल्थकेअर, मेटल आणि पॉवर निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप निर्देशांक १.३१ टक्के आणि स्मॉलकॅप २.११ टक्क्यांनी घसरला.

गुंतवणूकदारांची सावध भूमिका

आशियाई बाजारातील तेजीचा मागोवा घेत आज (दि.१२) भारतीय शेअर बाजारात जोरदार रिकव्हरी दिसून आली होती. सपाट सुरुवातीनंतर सेन्सेक्स ४५० अंकांच्या वाढीसह ७३,९००च्या वर व्यवहार केला. पण ही तेजी टिकून राहिली नाही. बाजारात सर्वाधिक विक्री रियल्टी, सरकारी बँकिंग आणि एफएमसीजी क्षेत्रात झाली. तर आयटी क्षेत्रात खरेदीचा जोर राहिला. मुख्य देशांतर्गत डेटा आणि अमेरिकेच्या महागाईवाढीचा आकडा जाहीर होण्याआधी गुंतवणूकदारांची आज सावध भूमिका दिसून आली.

गुंतवणूकदारांना ४ लाख कोटींचा फटका

बाजारातील आजच्या चढ-उतारात स्मॉल आणि मिडकॅप शेअर्सचे अधिक नुकसान झाले. यामुळे गुंतवणूकदारांना ४ लाख कोटींचा फटका बसला. आज १२ मार्च रोजी एकूण बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३८५.५७ लाख कोटींवर आले. ११ मार्च रोजी ते ३८९.६५ लाख कोटी रुपये होते. याचाच अर्थ बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४.०८ लाख कोटींनी कमी झाले.

'हे' शेअर्स तेजीत

सेन्सेक्स आज ७३,५१६ वर खुला झाला होता. त्याने आज ७४ हजारांच्या अंकाला स्पर्श केला होता. पण त्यानंतर तो ७३,७०० च्या खाली आला. सेन्सेक्सवर एचडीएफसी बँक, टीसीएस, इन्फोसिस, मारुती, रिलायन्स या शेअर्समध्ये तेजी राहिली. तर एसबीआय, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, नेस्ले इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी, विप्रो, एनटीपीसी हे शेअर्स घसरले.

निफ्टीवर एचडीएफसी बँक, टीसीएस, LTIMindtree, मारुती, इन्फोसिस हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर सिप्ला, ग्रासीम, अदानी एंटरप्रायजेस, बजाज ऑटो, एसबीआय हे शेअर्स घसरले.

निफ्टी रियल्टी, मीडिया आणि पीएसयू बँक यासह बहुतांश क्षेत्रीय निर्देशांक नकारात्मक क्षेत्रात राहिले. निफ्टी आयटी हा केवळ तेजीत राहिला. तर निफ्टी खासगी बँक निर्देशांक सपाट पातळीवर राहिला.

आशियाई बाजार

हाँगकाँगचा Hang Seng निर्देशांक आशिया-पॅसिफिक बाजारपेठेत आघाडीवर राहिला. हँग सेंग ३ टक्क्यांनी वाढून १७,०९३ वर तर चीनचा CSI ३०० निर्देशांक ०.२३ टक्क्यांनी वाढून ३,५९७.४९ वर बंद झाला. (Hang Seng Index) जपानचा निक्केई सलग दुसऱ्या दिवशी घसरला. हा निर्देशांक ०.०६ टक्क्यांनी खाली आला.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news