पुढारी ऑनलाईन डेस्क : सीमा देव यांनी १९५७ साली आलिया भोगासी या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांनी भूमिका साकारलेल्या आनंद, जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला हे चित्रपट विशेष गाजले. त्यांचा जन्म आणि बालपण मुंबईतील गिरगाव येथे झाले होते. जेव्हा त्या शाळेत होतेया, तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यानंतर त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या भावाच्या सूचनेनुसार त्यांनी चित्रपटासाठी आपले नाव सीमा असे ठेवले होते. त्यांचे मुळचे नाव नलिनी सराफ असे होते. (Seema Deo)
मुंबईच्या गोरेगाव पश्चिममध्ये एका फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये रेल्वेने प्रवास करताना अभिनेता रमेश देव यांच्यासी भेट झाली होती. रेल्वेत रमेश देव यांची आईदेखील होती. पहिल्याच भेटीत रमेश यांच्या आईशी सीमा यांनी वाद घातला होता. एक मंच कलाकार म्हणून तिने आपले करिअर सुरू केले. आणि विविध हिंदी – मराठी नाटकांमध्ये अभिनय केला. नंतर त्यांनी १९६२ मध्ये 'वरदक्षिणा' चित्रपटासाठी एकत्र सह्या केल्या. चित्रपटाच्या शूटिंग वेळी दोघांना एकमेकांशी प्रेम झालं. पुढे सीमा देव यांनी आपल्या पतीसोबत मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.
'दस लाख' (१९६६), 'सरस्वतीचंद्र' (१९६८), 'आनंद' (१९७१), 'नसीब अपना अपना' (१९८६), 'संसार' (१९८७) मध्ये अभिनय केला. १९७१ मध्ये सीमा देव आणि रमेश देव यांनी मुंबईमध्ये आपले चित्रपट प्रोडक्शन हाऊस -रमेश देव प्रोडक्शन (RDP) नावाने सुरू केले.
एका मुलाखतीत सीमा देव यांनी सांगितले होते की, रमेश देव यांनी एकदा त्यांना ज्वेलरीच्या दुकानात नेले. ते नेहमी गिफ्ट देण्यासाठी आतुर असायचे. सीमा देव यांचा लग्नाचा वाढदिवस होता, त्यावेळचा हा किस्सा आहे. सीमा यांनी मुलाखतीत सांगितलं की, नला महागडे गिफ्ट आवडत नव्हते. परंतु, रमेश इमेशनल ब्लॅकमेल करायचे. ते म्हणायचे, 'मला माहिती नाही की, मी उद्या तुझ्यासोबत असेन किंवा नसेन. यासाठी आज मी तुझ्यासाठी खरेदी करतो. मग आम्ही आमच्या मुलांसोबत जेवायला निघालो. त्यांनी आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला माझ्यासाठी हिऱ्याचे ईअररिंग्ज आणले होते, जे मी मागील ५२ वर्षापासून घालतेय."