Scotland | मासिक पाळीवर टिप्पणी करणं बॉसला भोवलं; महिलेला द्यावे लागणार ३७ लाख रुपये, काय आहे प्रकरण?

Scotland | मासिक पाळीवर टिप्पणी करणं बॉसला भोवलं; महिलेला द्यावे लागणार ३७ लाख रुपये, काय आहे प्रकरण?

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिलेच्या मासिक पाळीवर भाष्य करणे बॉसला महागात पडलं आहे. महिलेने तिच्या बॉसविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सुनावणीनंतर न्यायालयाने बॉसला दोषी ठरवले आणि नुकसानभरपाई म्हणून पीडित महिलेला ३७ हजार पौंड (सुमारे ३७ लाख रुपये) देण्याचे आदेश दिले आहेत. ही घटना स्कॉटलंडमधील आहे.

संबंधित बातम्या : 

काय आहे संपूर्ण प्रकरण

कॅरेन फ्रॅकरसन नावाची महिला १९९५ पासून स्कॉटलंडच्या आर्डेनशायरच्या पीटरहेड भागात असलेल्या थिस्सल मरीन नावाच्या इंजिनिअरिंग फर्ममध्ये काम करत होती. महिलेचा आरोप आहे की, तिच्या बॉसने तिच्या मासिक पाळीचे कारण सांगून तिच्यावर टिप्पणी केली आणि तिला नोकरी सोडण्यास सांगितले. डिसेंबर २०२२ मध्ये तिने प्रचंड बर्फवृष्टी आणि तिची मासिक पाळी या कारणास्तव दोन दिवस घरातून काम केले. दोन दिवसांनंतर जेव्हा ती ऑफिसला गेली तेव्हा तिचा बॉस आणि कंपनीचे एमडी जिम क्लार्क यांनी तिच्या मासिक पाळीवर टिप्पणी केली आणि तिची वैद्यकीय समस्या स्वीकारण्यास नकार दिला, असे महिलेने न्यायालयात सांगितले.

महिलेचे कंपनीवर गंभीर आरोप

त्यानंतर संतापलेल्या महिलेने न्यायालयात धाव घेतली होती. कंपनीने तिचा छळ केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला होता. २७ वर्षांपासून कंपनीने तिला चुकीची वागणूक दिली. तिच्या कंपनीचे बॉस अनेकदा आजारी पडणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल अपमानास्पद टिप्पणी करतात, असेही तिने आरोपात म्हटले होते.

खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने सांगितले की, "जिम क्लार्क याने आयुष्यात खूप मिळवले आहे आणि त्याच्याकडे असे अनेक गुण आहेत जे अंगीकारता येतील. पण त्याला आपल्या कर्मचाऱ्यांबद्दल दया नाही." यानंतर न्यायालयाने कंपनीला पीडित महिलेला ३७ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. क्लार्कने महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान केल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news