पुढारी ऑनलाईन डेस्क : जीवनाला कलाटणी देणाऱ्या 'आधारवड' चित्रपटाचा २ ऑक्टोबर २०२३ रोजी 'अल्ट्रा झकास' या मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. सुरेश शंकर झाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून चित्रपटात सयाजी शिंदे, शक्ती कपूर, राखी सावंत, रोहित हंचाटे आणि अतुल परचुरे हे नामवंत कलाकार दिसणार आहेत.
संबधित बातम्या
चित्रपटाची कथा श्रवण आणि त्याच्या प्रतिभावंत आयुष्याभोवती फिरते. श्रवणच्या आयुष्यात घडलेली एक भावनाविवश करणारी घटना त्याच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देऊन जाणारा आहे. श्रवणचा जीवनप्रवास प्रत्येकासाठी एक प्रेरणा असून विचार करायला लावणारा आहे. यामुले या चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हेही वाचा :