Satyendra Jain: सर्वोच्च न्यायालयाचा सत्येंद्र जैन यांना पुन्हा दिलासा; मात्र १ सप्टेंबरपासून नियमित जामिनावर सुनावणी

सत्येंद्र जैन
सत्येंद्र जैन

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: दिल्ली सरकारचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्या अंतरिम जामीन एक सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय आधारावर जैन यांचा जामीन वाढवला आहे. १ सप्टेंबर रोजी जैन यांच्या नियमित जामीन याचिकेवर न्यायालय सुनावणी घेणार आहे. सीबीआयने जैन यांचा अंतरिम जामीन वाढवण्यास विरोध दर्शवला होता, हे विशेष.

जैन सध्या वैद्यकीय आधारावर अंतरिम जामिनावर आहेत.जामिनाची मुदत संपल्यानंतर तो वाढवण्यासंबंधी न्यायालयाने सुनावणी घेतली.प्रकृती अस्वस्थतेमुळे जैन यांना २६ मे रोजी ६ आठवड्यांच्या अंतरिम जामीन मंजूर केला होता.जैन यांच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मागण्यात आला होता.आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात नियमित जामिनावर सुनावणी सुरू करण्यात येणार असल्याने जैन यांना आणखी दिलासा मिळणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सत्येंद्र जैन एक वर्षापासून तिहार तुरुंगात आहेत. त्यांची प्रकृती चांगलीच खालावल्याने, त्यांचे 35 किलो वजन कमी झाले आहे. तुरूंगात असताना ते तुरुंगाच्या बाथरूममध्ये पडले. त्यांच्या डोक्याला मार लागून मेंदूत रक्ताची गाठ झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. दरम्यान सत्येंद्र जैन यांच्या अंतरिम जामीनात वाढ १ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news