S Somanath : ‘विज्ञानाची तत्वे वेदांमधून घेतली’, इस्रो अध्यक्षांचे ‘ते’ भाषण पुन्हा व्हायरल

S Somanath : ‘विज्ञानाची तत्वे वेदांमधून घेतली’, इस्रो अध्यक्षांचे ‘ते’ भाषण पुन्हा व्हायरल

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : चांद्रयान-3 (chandrayaan 3) मोहिमेतील विक्रम लँडरने (vikram lander) 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग केले. या ऐतिहासिक क्षणानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनेचे (इस्रो) प्रमुख एस. सोमनाथ (isro chairman s somanath) यांनी आपण यश मिळवले असून भारताने चंद्रावर पाऊल टाकले आहे, अशी घोषणा केली. त्यांच्या या एकाच वाक्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. दरम्यान, इस्रो प्रमुख सोमनाथ (isro chairman s somanath) यांचे काही महिन्यांपूर्वीचे एक भाषण सध्या व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी बीजगणित, वर्गमुळे, वेळेचा सिद्धांत, स्थापत्यशास्त्र, धातूशास्त्र, अवकाश विज्ञानाचे सिद्धांत वेदांमधून घेतले असल्याचा मोठा दावा केला आहे. वेदांमधील हे सिद्धांत अरब देशांतून युरोपीय देशांत गेले. तेथील संशोधकांनी हे शोध आपल्या नावावर करून घेतले, असेही ते म्हणाले होते.

उज्जैन येथील महर्षि पाणिनी संस्कृत आणि वैदिक विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यातील त्यांचे हे भाषण असून यावेळी त्यांनी त्यांनी भारतीय वेदांबाबत मोठा दावा केला. सोमनाथ (isro chairman s somanath) पुढे म्हणतात, 'शास्त्रज्ञांकडून संस्कृत भाषेचा वापर केला जात असे. संस्कृत भाषा लिखित नव्हती. परंतु, लोक एकमेकांचे ऐकून शिकत होते. त्यामुळे ही भाषा आजपर्यंत टिकली आहे. संगणकाची भाषा देखील संस्कृत आहे. ज्यांना संगणक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता शिकायची आहे त्यांच्यासाठी संस्कृत भाषा खूप फायदेशीर ठरू शकते. संस्कृत भाषेत लिहिलेले भारतीय साहित्य तात्विकदृष्ट्या खूप समृद्ध आहे. संस्कृतमधील संस्कृती, धर्म आणि विज्ञान यांच्या अभ्यासात फारसा फरक नाही, असे त्यांनी सांगितल्याचे व्हिडिओतून समोर आले आहे.

'अंतराळ विज्ञान, चिकिस्ता, भौतिक विज्ञान, रसायन विज्ञान इत्यादी संस्कृत भाषेत लिहिले गेले होते. परंतु आजपर्यंत त्यावर फारसे संशोधन झालेले नाही. अंतराळ विज्ञानावर आधारित सूर्य सिद्धांत हे एक पुस्तक आहे. हे पुस्तक आठव्या शतकातील असल्याचे मानले जाते. या पुस्तकात सौर ऊर्जा आणि टाइम स्केलचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे, हे जाणून मला खूप आश्चर्य वाटले', असेही सोमनाथ (isro chairman s somanath) यांनी म्हटले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news