Milind Safai : मराठी सिनेसृष्टीला धक्का! अभिनेते मिलिंद सफई यांचे निधन | पुढारी

Milind Safai : मराठी सिनेसृष्टीला धक्का! अभिनेते मिलिंद सफई यांचे निधन

पुढारी ऑनलाईन: ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनानंतर मराठी सिनेसृष्टीला आणखी एक धक्का बसला आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेते मिलिंद सफई यांचे आज (दि.२५) निधन झाले. ते दिर्घ काळापासून कॅन्सरशी झुंजत देत होते, अखेर आज त्यांची ही झुंज अपयशी ठरली. या संदर्भात अभिनेते जयवंत वाडकर यांनी फेसबुकवरून (Milind Safai) पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेते मिलिंद सफाई यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटात भूमिका साकारली आहे. त्यांनी प्रेमाची गोष्ट, थँक्यू विठ्ठला, पोस्टर बॉईज, लकडाऊन बी पॉझिटिव्ह यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. तर आई कुठे काय करते या मालिकेशिवाय त्यांनी ‘सांग तू आहेस का’, ‘आशीर्वाद तुझा एकविरा आई’, ‘100 डेज’ यांमध्येही ते महत्त्वपूर्ण भूमिकेत (Milind Safai) होते.

हेही वाचा:

 

Back to top button