Satyendar Jain :दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज

Satyendar Jain :दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज

पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली : हवाला प्रकरणात गंभीर आरोप झालेले दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचा जामीनअर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. गतवर्षीच्या मे महिन्यात जैन यांना तपास संस्थांनी अटक केली होती. दिल्लीतील मद्य धोरण घोटाळा प्रकरणात नाव आलेल्या मनीष शिसोदिया यांच्यासोबत जैन यांचे मंत्रिपद काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काढून घेतले होते. (Satyendar Jain)

सत्येंद्र जैन यांच्यासह वैभव जैन आणि अंकुश जैन यांचे जामीनअर्जही न्यायमूर्ती दिनेशकुमार शर्मा यांनी फेटाळून लावले. सत्येंद्र जैन हे प्रभावशाली व्यक्ती आहेत. तुरुंगातून बाहेर आले तर साक्षीदारांना प्रभावित करु शकतात तसेच हवाला प्रतिबंधक कायद्यानुसार जामीन प्राप्त करण्यासाठी ज्या अटींची पूर्तता करावी लागते, त्या अटींची ते पूर्तता करु शकत नाहीत, त्यामुळे त्यांना जामीन देता येणार नाही, अशी टिप्पणी न्यायमूर्ती शर्मा यांनी केली. दरम्यान जैन यांचा जामीनअर्ज फेटाळण्यात आल्याचे भाजप प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी स्वागत केले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news