BSF Action : पंजाब सीमेवर पाकिस्तानातून अंमली पदार्थांची तस्करी; एकाला अटक; तस्करीसाठी ड्रोनचा वापर | पुढारी

BSF Action : पंजाब सीमेवर पाकिस्तानातून अंमली पदार्थांची तस्करी; एकाला अटक; तस्करीसाठी ड्रोनचा वापर

पुढारी ऑनलाइन डेस्क : पंजाबच्या तरन तारण पोलिसांनी बुधवारी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी कारवाई BSF Action करत पाकिस्तानातून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून 2.472 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी दिली.

पंजाबचे डीजीपी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार BSF Action , सीमापार अंमली पदार्थांच्या तस्करीच्या जाळ्यांविरुद्ध एक मोठे यश मिळवून, तरनतारन पोलिसांनी बीएसएफसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत एका व्यक्तीला अटक केली आहे आणि त्याच्या ताब्यातून 2.472 किलो हेरॉईन जप्त केले आहे.

डीजीपी यादव पुढे म्हणाले, “पाकिस्तानमधून ड्रग्जची वाहतूक करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात होता. तपासाबाबत माहिती देताना यादव म्हणाले की, नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे BSF Action

अलीकडील काळात पाकिस्तानातून ड्रोनद्वारे अमंली पदार्थांची तस्करी करण्याचे प्रकार वाढले आहे. काही दिवसांपूर्वी अंमली पदार्थ घेऊन पाकिस्तानातून भारतीय सीमेत घुसणाऱ्या ड्रोनला भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी खाली पाडले होते. BSF Action

हे ही वाचा :

Foreign Investment : मोठी बातमी! फ्रान्स करणार महाराष्ट्रात ‘5700 कोटीं’ची गुंतवणूक; ‘इतके’ थेट रोजगार निर्माण होणार

श्री धान्य की आदिम धान्य!

Back to top button