सातारा : वेण्णालेक धुक्‍यात हरवले; कास पठार, बामणोली, तापोळा पर्यटकांनी फुलले

वेण्णालेक
वेण्णालेक

सातारा ; पुढारी वृत्‍तसेवा महाराष्‍ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्‍हणून महाबळेश्वर पर्यटकांचे आकर्षणाचे मुख्य ठिकाण आहे. नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णालेक व परिसर धुक्यात हरवला आहे. पावसाळी वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी येथे गर्दी होत आहे. दाट धुकं, कडाक्याची थंडी व धुवाधार पाऊस अश्या अल्‍हाददायक वातावरणात पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. हौशी पर्यटक अशा थंड पावसाळी वातावरणात नौकाविहाराचा आनंद घेत असून, या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे.

महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्‍हणून प्रसिध्द आहे. देशभरातील पर्यटक महाबळेश्वर मध्ये पर्यटनासाठी येत असतात. वर्षभर महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी पहावयास मिळते. मात्र पावसाळ्यात या ठिकाणी प्रचंड पाऊस आणि धुके पडते. धुवाधार पाऊस, थंडगार वारे आणि धुक्‍याची दुलई अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावले महाबळेश्वरकडे वळतात. या ठिकाणचे वेण्णालेक धुक्‍यात हरवलं असून, थंडगार वाऱ्यात पावसांच्या धारा अंगावर झेलत बोटींगचा आनंद लुटण्याची मजा पर्यटक अनुभवत आहेत. कास पठार, बामणोली, तापोळा हा परिसरही हिरवाईने नटला असून, पर्यटकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केल्‍याचे दिसून येत आहे.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news