

पुढारी ऑनलाईन: Us vs China: अमेरिकेच्या अलास्का राज्यातून २८ जानेवारी, २०२३ दरम्यान एका गुप्तचर फुग्याने अमेरिकेच्या हवाई हद्दीत प्रवेश केला होता. दरम्यान, अमेरिका आणि चीनच्या हद्दीत या फुग्याच्या संशयास्पद हालचाली पाहायला मिळाल्या होत्या. दरम्यान, अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने ४ फेब्रुवारीला हा फुगा पाडला होता. त्यानंतर आता अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने 'या' गुप्तचर फुग्याने कोणतीही गुप्त माहिती गोळा (Us vs China) केली नसल्याचे म्हटले आहे.
फेब्रुवारीमध्ये या चिनी गुप्तचर फुग्याने अमेरिकेतील अनेक राज्य आणि संवेदनशील ठिकाणांच्या तळांवरदेखील उड्डाण केले होते. अमेरिका हद्दीच्या हवेत फिरणाऱ्या या चीनी गुप्तचर फुग्यावरून अमेरिका आणि चीन हद्दीवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. यावर खुलासा करताना चीनने देखील हा फुगा हवामानाची माहिती गोळा करण्यासाठी पाठवण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. तरी देखील अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने या चिनी फुग्यावर (Us vs China) कारवाई करत तो पाडला होता. पंरतु अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने यावर मोठा खुलासा केला आहे.
हा चिनी फुगा हेरगिरीसाठी होता की नाही हे पेंटागॉनने स्पष्टपणे सांगितलेले नाही. तथापि, संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल पॅट रायडर यांनी सांगितले की, या फुग्याने कोणताही संवेदनशील डेटा गोळा केला नाही किंवा चीनला पाठवला नाही. तसेच आम्हाला माहित आहे की या फुग्यामध्ये बुद्धिमत्ता गोळा करण्याची क्षमता (Us vs China) होती, असे देखील रायडर यांनी स्पष्ट केले आहे.