BMC Covid Scam : BMC कोविड घोटाळाप्रकरणी संजीव जयस्वाल चौकशीसाठी ईडी कार्यालयात | पुढारी

BMC Covid Scam : BMC कोविड घोटाळाप्रकरणी संजीव जयस्वाल चौकशीसाठी ईडी कार्यालयात

पुढारी ऑनलाईन: BMC Covid Scam : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील (BMC) कोविड घोटाळ्याशी संबंधित प्रकरणी (BMC Covid scam) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. याप्रकरणी संजीव जयस्वाल हे चौकशीसाठी आज (दि.३० जून) मुंबईमधील ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत, असे वृत्त एएनआयने दिले आहे.

BMC कोविड घोटाळाप्रकरणी मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले आहे. यापूर्वी त्यांना समन्स बजावत, ईडीकडून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. यापूर्वीही ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते, मात्र संजीव जयस्वाल ईडीसमोर हजर झाले नाहीत. BMC कोविड घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 8 जणांनी त्यांचे जबाब नोंदवले आहे, अशी माहिती देखील एएनआयने दिली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील (BMC) कोविड घोटाळ्याशी संबंधित (BMC Covid scam) प्रकरणी ईडीने उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) आणि आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणी कारवाई केली होती. याप्रकरणी मुंबईत १६ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. दरम्यान सुरेश चव्हाण यांच्या घरावरही ईडीने छापे टाकले असल्याची माहिती आहे.

हेही वाचा:

Back to top button