Rahul Gandhi in Manipur : राहुल गांधींच्या मणिपूर दौऱ्यावर आसामचे मुख्यमंत्री शर्मा म्हणाले, हा फक्त मीडिया…

Rahul Gandhi in Manipur : राहुल गांधींच्या मणिपूर दौऱ्यावर आसामचे मुख्यमंत्री शर्मा म्हणाले, हा फक्त मीडिया…

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार राहुल गांधीच्या मणिपूर दौऱ्यावर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधी गुरुवारी (दि.२९) दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. इम्फाळला पोहोचल्यानंतर ते मदत छावण्यांना भेट देण्यासाठी चुरचंदपूरच्या दिशेने जात होते. हिंसाचाराच्या भीतीने पोलिसांनी ताफा थांबवला होता. त्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद सुरू झाला आहे. (Rahul Gandhi in Manipur)

राहुल गांधी काय प्रश्न सोडवणार – हेमंता बिस्वा शर्मा

राहुल गांधीच्या मणिपूर दौऱ्या दरम्यान त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला यावरुन काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला. त्यांनी भाजप  'घाणेरडे राजकीय खेळ' खेळत आहे, असे म्हंटले आहे. तर काँग्रेसच्या आरोपानंतर भारतीय जनता पक्षाने यावर प्रत्युत्तर दिले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देताना म्हटलं आहे की, मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय नेत्याला जाण्याची गरज नाही. त्यांच्या जाण्याने कोणताही तोडगा निघणार नसल्याचे शर्मा म्हणाले. त्यांच्या भेटीचा काही सकारात्मक परिणाम झाला तर ती वेगळीच बाब आहे. मात्र, त्यांची ही भेट केवळ प्रसारमाध्यमांचीच असेल. याचा परिणाम पुढे किंवा नंतर होणार नाही.

Rahul Gandhi in Manipur : राजकारण करणे योग्य नाही

हिमंता बिस्वा शर्मा यांनी एक ट्विट करतही म्हंटल आहे की, "एखाद्या राजकीय नेत्याने आपल्या तथाकथित भेटीचा वापर करून मतभेद वाढवणे हे देशाच्या हिताचे नाही, मणिपूरमधील परिस्थिती लक्षात घेता, तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे. कोणत्याही राजकीय हालचालींची गरज नाही. जर या भेटीचे सकारात्मक परिणाम येत नसेल तर तो फक्त एक मीडिया प्रचार असेल.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news