संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विसाव्यासाठी भांडगाव येथे दाखल

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विसाव्यासाठी भांडगाव येथे दाखल

यवत : पुढारी वृत्तसेवा: संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी 10 वाजता भांडगाव (ता. दौंड) येथे विसाव्यासाठी दाखल झाला. यावेळी भांडगाव ग्रामस्थांच्या वतीने सरपंच संतोष दोरगे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले तर पंचायत समिती उपसभापती नितीन दोरगे, लक्ष्मण काटकर, विजय दोरगे, रामदास दोरगे, प्रमोद दोरगे, रवींद्र दोरगे व इतर मान्यवर उपस्थित होते. दरवर्षी पालखी सोहळ्यातील पादुका भांडगावमधील मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येतात. परंतु या वेळी पालखी सोहळा प्रशासनाने पालखी रथात पादुका ठेवूनच दर्शन घेण्याचे आवाहन भाविकांना केले.

त्यामुळे गावातील रोकडोबानाथ मंदिर परिसरात तुकोबांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुबंड उडाली असल्याचे दिसून येते होते. शनिवारी रात्रीचा यवत मुक्काम आटोपून पालखी सोहळा यवत गावाला ग्राम प्रदिक्षनां करत दुपारच्या विसाव्यासाठी भांडगावमध्ये दाखल झाला. त्यांनतर याच ठिकाणी वारकरी न्याहारी करतात आणि पुढील मुक्कामचे ठिकाण असणाऱ्या वरवंडकडे मार्गस्थ होत असतात. तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील सर्वात जवळचा टप्पा म्हणून वरवंडचा मुक्काम ओळखला जातो. त्यामुळे पालखी मार्गावर वारकरी मंडळी निवांतपणे मार्गस्थ होताना दिसत होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news