पुढारी ऑनलाईन डेस्क : महाविकास आघाडीतील लोकसभा निवडणूक जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. आघाडीत शिवसेना (ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यात अजूनही १५ जागांवर वाद सुरू आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीने दिली. त्यानंतर वंचित आघाडी मविआमध्ये राहणार का? याबाबत चर्चा सुरू आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Lok Sabha elections 2024)
"महाविकास आघाडीत काहीही गडबड नाही. प्रकाश आंबेडकर आज आमच्यासोबत प्रस्तावावर चर्चा करतील. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतही चर्चा सुरू आहे. जागावाटपासंदर्भात १-२ दिवसात बैठक होईल," असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. आज (दि.९) माध्यमांशी ते बोलत होते.
दरम्यान, महाविकास आघाडीबरोबर जाण्याची आपली इच्छा आहे. मात्र, महाविकास आघाडीचा समझोता न झाल्यास स्वतंत्र ४८ जागा लढण्याची तयारी असून, २७ जागांवर तयारी पूर्ण झाली असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी सांगितले आहे.
हेही वाचा :