गुवाहाटी ; पुढारी ऑनलाईन ;
आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काल (शुक्रवार) संध्याकाळी तेजपूरला पोहोचले. तेजपूरमध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी येथून काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पोहोचले. यावेळी संपूर्ण मार्गावर पंतप्रधानांचे जंगी स्वागत करण्यात आले. शुक्रवारी काझीरंगा येथे रात्रभर मुक्काम केल्यानंतर आज सकाळी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात हत्ती आणि जीप सफारीचा पंतप्रधान मोदींनी आनंद घेतला.
शनिवारी पंतप्रधान मोदी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी इटानगरमध्ये येणार आहेत. अरुणाचल प्रदेशानंतर पंतप्रधान दुपारी जोरहाटला परततील आणि होलोंगाथर येथे प्रसिद्ध अहोम योद्धा लचित बोरफुकन यांच्या १२५ फूट उंच पुतळ्याचे अनावरण करतील.
ते शनिवारी इटानगर येथे येतील आणि २० हून अधिक प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात उंचावर (१३००० फूट) (सेला पास) बांधण्यात आलेला रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा, बहुप्रतिक्षित आणि सर्वात लांब बोगदा देशाला समर्पित करणार आहेत. हा दुहेरी सर्व हवामानात उपयोगी ठरणारा बोगदा अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामिंग आणि तवांग जिल्ह्यांना जोडेल. LAC ला पोहोचण्याचा हा एकमेव मार्ग आहे.
हेही वाचा :