Sanjay Raut News : ‘मुख्यमंत्री नव्हे हे तर मख्खमंत्री’; संजय राऊत यांची खोचक टीका

संजय राऊत
संजय राऊत

पुढारी ऑनलाई डेस्क : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना राऊत यांनी शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांवर थेट टीका केली. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री नसून मख्खमंत्री आहे, असे म्हणत खोचक टीकास्त्र सोडले. तसेच त्यांनी राज्याची खरी सुत्रे ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून मुख्यमंत्री फक्त 40 खोक्यांच्या आमदारांना एकत्र ठेवण्याचे काम करत आहे. याशिवाय ते काहीही करत नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला डिवचले आहे.

यावेळी बोलताना राऊत पुढे म्हणाले, सरकार विरोधकांना ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवत आहे. तर अन्य लोकांचा ते बचाव करताना दिसतात. जसे की मी त्यांना राहुल कूल यांचे 500 कोटींचे प्रकरण दिले. मात्र, त्यावर मुख्यमंत्री बोलत नाहीत. त्यामुळे त्यांचा बचाव कोण करत आहे, हे स्पष्ट पणे दिसत आहे. सध्या राज्यात अराकता निर्माण झाली आहे. कारण राज्यात मुख्यमंत्रीच नाहीत. शिंदे हे मख्खमंत्री आहेत. मुख्यमंत्री आणि मख्खमंत्री यामध्ये फरक आहे. राज्यात मख्खपणे सर्वत्र हे सुरू आहे. शिंदे हे मुख्यमंत्री असते तर अशी अराजकता पसरली नसती, अशी खोचक टीका राऊत यांनी केली आहे. (Sanjay Raut News)

Sanjay Raut News : फडणवीसांचे हात दगडाखाली

माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले की, राज्यातील अस्वस्थता फडणवीसांनी समजून घ्यावी. प्रश्न विचारल्यास सरकार तुरुंगात टाकते. पण आम्ही तरीही प्रश्न विचारत जावू. फडणवीसांचे हात दगडाखाली अडकले आहेत. त्यांना ते काढताही येत नाही आणि ठेवताही येत नाही आहे. त्यामुळे त्यांचे नाकाने कांदे सोलणे सुरु आहे आणि परत काही झाले की विरोधकांवर आरोप करायचे, अशा शब्दांत त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. तसेच सध्या तुम्ही सत्तेवर आहात. तुमच्या काळात काय सुरू आहे ते पहा. गेल्या आठ-नऊ महिन्याचा काळ पाहा. आम्ही आमचा काळ पाहतो, असेही ते म्हणाले. याच मुद्द्यावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली.  राऊत म्हणाले, मोदी तिकडे काँग्रेसचा ६० वर्षांचा काळ सांगतात आणि तुम्ही आमचा अडीच वर्षांचा काळ सांगत आहात. पण तुमचा काळ कधी येणार, असे म्हणत राऊत यांनी सत्ताधा-यांवर टीका केली.

आमच्यावर बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार

अमृता फडणवीस प्रकरणात महाविकास आघाडीच्या काळातील काही नेते आणि अधिका-यांची नावे समोर येतील असे फडणवीस यांनी म्हटले होते. यावर विचारले असता राऊत म्हणाले, मी यावर बोलणार नाही तो त्यांचा कौटूंबिक प्रश्न आहे. भारतीय जनता पक्षाला जशी कुटुंबात घुसण्याची सवय आहे, तशी आम्हाला सवय नाही आहे. आम्ही कुटुंबापर्यंत जात नाही. आमच्यावर काही संस्कार आहेत. प्रकरण पोलिस आणि न्यायालयात आहे पण जर हे प्रकरण गृहमंत्र्यांच्या घरापर्यंत जात असेल तर हे गंभीर आहे. आमच्याकडे बोट करत असताना काही बोटे तुमच्याकडेही आहेत. मला यावर तोंड उघडायला भाग पाडू नका. मी पुन्हा एकदा सांगतो हा विषय कौटुंबिक आहे आणि आम्ही कुटुंबापर्यंत जात नाही. आमच्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत आणि आम्ही ते पाळतो.

शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला आहे तर एकीकडे जुन्या पेन्शनसाठी आंदोलन सुरु आहे. यावर बोलत असताना राऊत म्हणाले, या राज्यात सरकारच नाही आहे. सरकार म्हणजे कोण आहे हा प्रश्न उपस्थित आहे. राज्यात गदारोळ आणि अराजकता माजली आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news