छत्रपती संभाजीनगर : PM आवास योजना फसवणुकीप्रकरणी ED ची छापेमारी | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : PM आवास योजना फसवणुकीप्रकरणी ED ची छापेमारी

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान आवास योजनेच्या फसवणुकीप्रकरणी आज सकाळी (दि.१७) छत्रपती संभाजी नगरमध्ये ईडीकडून छापे टाकण्यात आले. याप्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छत्रपती संभाजी नगरमध्ये तीन ठिकाणी छापे टाकले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या निविदेत घोटाळा केल्याप्रकरणी मनपाने सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या एफआयआरच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा ईडी तपास करत आहे. याच प्रकरणात शुक्रवारपासून (दि.१० ) आरोपींच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी सुरू झाली आहे.

मनपाच्या उपायुक्त तथा प्रधानमंत्री आवास योजना विभाग प्रमुख अपर्णा थेटे यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, आरोपी कंपनी समरथ कंन्ट्रक्शन ॲण्ड जे.व्ही., इंडोग्लोबल इंफ्रास्ट्रक्चर सर्विसेस, जॅगवार ग्लोबल सर्विसेस व त्यामधील संघातील सदस्य यांनी एकाच आय.पी. अँड्रेस 103.211.61.184 या वरुन निविदा दाखल केली आहे. यांनी महानगरपालिकेच्या निवीदा संहीतेतील अटी व शर्तीचे उल्लंघन करत, शासनाची आणि मनपाची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता.

कंत्राटदारास समरथ कंन्ट्रक्शन ॲण्ड जे. व्ही. यांनी मनपाची निवि0दा मिळवून देऊन मनपा आणि शासनाची फसवणूक केली. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे हे करीत आहेत. दरम्यान याच प्रकरणात आता ईडीची छापेमारी सुरू झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा:

Back to top button