आज माध्यमांशी बोलताना त्यांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला. बोलताना ते म्हणाले, " आम्ही दोन दिवसात नागपूरात जातोय अनेक विषय समोर आणू़. उठसूट एसआयटी स्थापन करायची. पोलिसांना काही कामच ठेवायचं नाही. सत्तेचा यंत्रेणाचा गेैरवापर सर्रास केला जात आहे. एसआयटी ५० खोक्यांसाठी स्थापन करा. काहीही आरोप करायचे. बदनामी करायची. बदनामी हे शस्त्र वापरायचं. पण आम्ही बदनामीला घाबरत नाही. आम्ही उसळून उठू. शिवसेना या अग्निदिव्यातून बाहेर पडेल. अधिक उजळून बाहेर पडू. आम्ही सर्व प्रकारच्या चौकीशांना सामोरे जाणार आहे. सर्वांची खुली चौकशी करा असेही त्यांनी आवाहन केले.