पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्वोच्च न्यायलयाने काल (दि.११) जो निर्णय दिला आहे त्याचे विश्वेषण या सरकराने चुकीच्या पद्धतीने केले आहे.शिंद- फडणवीस सरकारचा अंत जवळ आला आहे. हे सरकार बेकायदेशीर आहे. येत्या तीन तीन महिन्यात हे सरकार कोसळणार. शिंदे-फडणवीस सरकराने घेतलेले जे निर्णय घेतले आहेत ते सर्व निर्णय बेकायदेशीर आहेत. आणि त्यांचे निर्णय अधिकाऱ्यांनी पाळू नयेत. बेकायदा सरकराचे बेकायदा निर्णय पाळू नका. असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. (Sanjay Raut News)
संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, सर्वोच्च न्यायलयाने काल (दि.११) जो निर्णय दिला आहे, त्याचे विश्वेषण या सरकराने चुकीच्या पद्धतीने केले आहे. फडणवीसांना कायद्याची पुस्तकं वाचायला हवीत. सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयानंतर राज्यात नंगानाच सुरु आहे. हे सरकार पुर्णपणे बेकायदेशीर आहे. कालचा निकाल अगदी स्पष्ट आहे. त्यांचे चेहरे बघा ते आतून रडत आहेत. एकनाथ शिंदे यांची निवड अपात्र आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने हे सरकार अपात्र ठरवलं आहे. पुढे बोलत अशताना ते असेही म्हणाले, १६ आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीतत ९० दिवसात निर्णय द्यावा. १६ आमदारांना घरी बसाव लागेल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अनेक पक्ष बदलले आहेत. नार्वेकर उद्या कोणत्या पक्षात असतील हे माहित नाही.
हेही वाचा