PM Modi on Education policy : २१ व्या शतकातील आधुनिक आवश्यकतेनुसार नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची आखणी | पुढारी

PM Modi on Education policy : २१ व्या शतकातील आधुनिक आवश्यकतेनुसार नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची आखणी

पुढारी ऑनलाइन डेस्क : PM Modi on Education policy : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची हे २१ व्या शतकातील आधुनिक आवश्यकतेनुसार करण्यात आली आहे. हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २१ व्या शतकातील आधुनिक गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे नवीन व्यवस्था निर्माण करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गांधीनगर येथे अखिल भारतीय शिक्षा संघ अधिवेशनात मार्गदर्शन करत आहेत. यावेळी त्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांवर PM Modi on Education policy महत्वपूर्ण टिप्पणी केली. तसेच शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना आजच्या काळातील महत्वाच्या आव्हानांवर भाष्य केले.

नवीन शैक्षणिक धोरणाविषयी PM Modi on Education policy बोलताना मोदी पुढे म्हणाले, गुजरात मधील शिक्षकांसोबत असलेले माझे जे अनुभव आहेत, त्या अनुभवांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखण्यात मोठी मदत केली. शैक्षणिक व्यवस्थेबाबत बोलताना ते म्हणाले, आम्ही इतकी वर्ष शाळेत शिक्षेच्या नावाखाली केवळ पुस्तकी ज्ञान देत होतो. मात्र नवीन शैक्षणिक धोरणात जुन्या अप्रासंगिक व्यवस्थेत परिवर्तन करून प्रायोगिक (Practical Besed) आधारावर दिली जाणारी शिक्षा व्यवस्था निर्माण करत आहोत.

यावेळी त्यांनी अन्य मुद्यांवरही भाष्य केले. ज्यामध्ये शाळेत शौचालय नसल्याने अनेक मुली शाळा सोडून देत असत. यासाठी आम्ही यावर विशेष अभियान चालवत मुलींसाठी शाळेत वेगळी शौचालये निर्माण केली. याशिवाय ते असेही म्हणाले की, मातृभाषेतून शिक्षण हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे आणखी एक गोष्ट आहे.

आजचे विद्यार्थी हे तुलनेने अधिक जिज्ञासू आहेत. त्यांच्यात जाणून घेण्यासाठी कुतुहलता आहे. तसेच आजकालचे विद्यार्थी हे निडर आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण आहेत. त्यामुळे त्यांचे स्वभाव शिक्षकांना आव्हान देतात. त्यामुळे शिक्षणाच्या पारंपारिक साच्यातून बाहेर निघून याकडे पाहायला हवे. विद्यार्थ्यांकडे आज माहितीचे अनेक स्रोत आहेत. त्यामुळे ते शिक्षकांना आव्हान देऊ शकतात. यावर मार्गदर्शन करताना पीएम मोदी म्हणाले, विद्यार्थ्यांकडे माहितीचा मोठा स्रोत असला तरी योग्य माहिती कोणती आणि अयोग्य माहिती कोणती हे फक्त शिक्षकच सांगू शकतात. तसेच टेक्नॉलॉजीने फक्त माहिती मिळू शकते चांगला दृष्टीकोन मिळू शकत नाही. हे फक्त गुरूच विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकतात.

शाळेचा जन्मदिवस साजरा करावा

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्वपूर्ण गोष्ट सुचवली. ते म्हणाले प्रत्येक शाळेने तिचा जन्मदिवस साजरा करावा. शाळा आणि विद्यार्थ्यांमधील Disconnect दूर करण्यासाठी ही परंपरा सुरू केली जाऊ शकते.

PM Modi : ‘सरकार तरुणांच्या प्रतिभा आणि उर्जेला योग्य संधी देण्यासाठी वचनबद्ध’; 71 हजार कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान

PM Modi : भारतात वाघांची संख्या वाढली; पंतप्रधान मोदींनी जाहीर केली आकडेवारी

Back to top button