ईडी कार्यालयात दाखल होण्यापुर्वी संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करत त्यांनी सांगितले होते की, " मी आज दुपारी १२ वाजता ईडीसमोर हजर होणार आहे. मला बजावलेल्या समन्सचा मी आदर करतो आणि तपास यंत्रणांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे." त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना आवाहनही केले आहे की, कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयात जमू नये. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना २७ जूनला समन्स बजावले होते, पण संजय राऊत नियोजित दौऱ्यामुळे ईडीसमोर चौकशीला हजर राहू शकले नाहीत. त्यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी उपस्थित राहून विनंती अर्ज सादर केला.