सांगली : मणेराजुरीजवळ वारकऱ्यांचा टेम्पो उलटला; ८ वारकरी जखमी

सांगली : मणेराजुरीजवळ वारकऱ्यांचा टेम्पो उलटला; ८ वारकरी जखमी

तासगाव : पुढारी वृत्तसेवा : विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर मणेराजुरी गावा जवळील एका वळणावर वारकऱ्यांचा टेम्पो पलटी झाला. या अपघातात चालकासह आठ वारकरी जखमी झाले. आज (दि.११) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सर्व वारकरी पंढरपूरहून भागाईवाडी (ता. शिराळा ) या आपल्या गावाकडे निघाले होते.

टेम्पो चालक सचिन कांबळे, दगडू सखाराम माने (वय ६५), कल्पना दीपक पाटील (४५), पार्वती आनंदराव लुगडे (६०), सुदाम गोरख पाटील (३३), हिराबाई विलास पवार (६५), हौसाबाई निवृत्ती लुगडे (६०) व लक्ष्मी मारुती पाटील (७०) (सर्व रा. भागाईवाडी, ता. शिराळा) अशी जखमींची नावे आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, भागाईवाडी येथील वारकरी आषाढी वारी निमित्त टेम्पोतून (एमएच १० के ८०९६) गेले होते.श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन ते सोमवारी सकाळी दहा वाजता पंढरपूरहून गावी जाण्यासाठी निघाले होते. मणेराजुरी गावाजवळील एका वळणावर टेम्पो आला असता टेम्पो चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने टेम्पो रस्त्याकडेला गटारीत पलटी झाला. टेम्पोत ३४ वारकरी होते. त्यातील आठ जण जखमी झाले.

अपघाताची माहिती गावात समजल्यानंतर गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच मणेराजुरी प्राथमिक आरोग्य केद्रातील वैद्यकीय अधिकारी नितीन साळूखे व एक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्राथमिक उपचार करून जखमींना तासगावच्या ग्रामीण रुग्णालयात हलवले. तर परिसरात पावसाची संततधार असल्याने अन्य वारकऱ्यांना मणेराजुरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात काही काळ ठेवण्यात आले होते. पर्यायी वाहनांची सोय झाल्यानंतर त्यांना भागाईवाडी कडे पाठविण्यात आले.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, तहसीलदार रवींद्र रांजणे, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश पवार, पोलीस पाटील दीपक तेली यांच्यासह स्थानिक नागरिकांनी मदत कार्यात मदत केली.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news