सांगली महापालिकेत ठेकेदारीवरून भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांत जोरदार हाणामारी!

सांगली महापालिकेत ठेकेदारीवरून भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांत जोरदार हाणामारी!

सांगली, पुढारी वृत्‍तसेवा : सांगली महापालिकेच्या आवारात टेंडरच्या वादातून भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांत फ्री स्टाईल हाणामारी झाली. स्थायी समितीचे सभापती धीरज सूर्यवंशी आणि ठेकेदार अतुल माने यांच्यात ही हाणामारी झाली. पोलिसांनी मध्यस्थी केली आणि अतुल माने यांना पोलीस ठाण्यात घेवून गेले. त्यामुळे पुढील घटना टळली. परंतु पोलीस स्टेशन बाहेर सूर्यवंशी समर्थकांचा मोठा जमाव गोळा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या पोलिसांकडून मध्यस्थी केली जात आहे.

.हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news