वसमत बाजार समितीच्या सभापती, उपसभापतींची बिनविरोध निवड

कृषी उत्पन्न बाजार समिती
कृषी उत्पन्न बाजार समिती

वसमत, पुढारी वृत्‍तसेवा : कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार समिती सभापती, उपसभापतीची निवड प्रक्रिया आज शुक्रवारी दुपारी १ वाजता सहायक निबंधक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी आसाराम गुसिंगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये सर्वानुमते सभापती पदी तानाजी बेंडे तर उपसभापती पदी सचिन भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे.

वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीवर आमदार राजुभैय्या नवघरे, माजी मंत्री डॉ.जयप्रकाश मुंदडा, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने १३ जागा जिंकत बहुमत सिद्ध केले आहे. भाजप व शिंदे गटाचे ४ तर १ अपक्ष असे एकूण १८ संचालक मंडळ आहे २० जानेवारी रोजी सहायक निबंधक कार्यालयात दुपारी १ वा निवडणूक निर्णय अधिकारी आसाराम गुसिंगे यांच्या अध्यक्षतेखाली सभापती, उपसभापती निवडीची विशेष सभा बोलावण्यात आली होती.

यावेळी सभापती पदासाठी तानाजी बेंडे यांचा अर्ज भरण्यात आला तर उपसभापती पदासाठी सचिन भोसले यांचा अर्ज भरण्यात आला. दोघांना सर्व संचालकांनी लेखी संमती दर्शवल्याने बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पार पडली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news