सांगली : संखहद्दीत शेततळ्यात बुडून अंकलगीच्या तरुणाचा मृत्यू

सांगली : संखहद्दीत शेततळ्यात बुडून अंकलगीच्या तरुणाचा मृत्यू
Published on
Updated on

जत शहर : पुढारी वृत्तसेवा  अंकलगी (ता. जत) येथील प्रताप नागनाथ पाटील (वय 28) या तरुणाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी संख हद्दीत घडली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः प्रताप पाटील हे बोर्गी येथे पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमन म्हणून मानधन तत्त्वावर काम करत होते. त्यांना लहानपणापासून फिट येत होती, असे त्यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात आले.

रविवार असल्याने संख हद्दीत असलेल्या एका शेततळ्यात ते पोहण्यासाठी गेले होते. त्यांच्यासमवेत लहान मुलेही तळ्याजवळ गेली होती. प्रताप हे पोहण्यासाठी तळ्यात गेले असता बराच वेळ बाहेर आले नाहीत. त्यामुळे मुलांनी वस्तीवर असलेल्या धानाप्पा कोळी यांना बोलावून याबाबत माहिती दिली. धानाप्पा कोळी यांनी तलावात उडी मारून त्यास बाहेर काढले. उपचारासाठी तत्काळ जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी ते मृत झाल्याचे सांगितले.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news