Sameer Wankhede NCB: समीर वानखेडे दिल्लीत गेल्यानंतर कुणाला भेटले?

Sameer Wankhede NCB
Sameer Wankhede NCB
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : Sameer Wankhede NCB : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे ( NCB ) विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मंगळवारी दुपारी दिल्लीतील एनसीबी मुख्यालयात हजेरी लावली. तब्बल दोन तास ते मुख्यालयात होते. दरम्यान त्यांनी कुणाची भेट घेतली, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशी ला त्यांना समोर जावे लागले का? हे अद्याप कळू शकलेले नाही. सोमवारी उशिरा रात्री वानखेडे दिल्लीत दाखल झाले होते.

अभिनेते शाहरुख खानचा मुलगा आर्यन यांच्या ड्रग्ज प्रकरणात भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार एनसीबी मुख्यालयाने भ्रष्टाचार प्रकरणी समीर वानखेडेविरुद्ध दक्षता चौकशी सुरू केली आहे. मुख्य दक्षता अधिकारी यासंबंधी स्वत: चौकशी करीत असल्याचे कळतेय. याच अनुषंगाने ते मुख्यालयी आल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान 'मला बोलावले गेले नाही. मी इथे एका वेगळ्या हेतूने आलो आहे.माझ्यावरील आरोप खोटे आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी सोमवारी दिली होती. अंमली पदार्थ प्रकरणी क्रूझवर टाकेलल्या छाप्यावरून वानखेडेंवर एका साक्षीदाराने भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी १८ कोटींची डील झाल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने केला आहे. प्रकरण दाबण्यासाठी समीर वानखेडे यांना कोट्यवधी रुपये दिले जाणार होते असा गंभीर आरोप साईलने केला होता. या आरोपामुळे या प्रकरणी वेगळे वळण लागले आहे. याच अनुषंगाने प्रकरणाची माहिती देण्यासाठी ते मुख्यालयी पोहोचले होते असे बोलले जात आहे.

दरम्यान, मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी आर्यन खान याच्या जामीन अर्जावर ( drug case bail hearing ) आज (दि. २६) मुंबई उच्‍च न्‍यायालयात सुनावणी झाली. पण आजही आर्यनला जामीन मिळाला नाही, उद्या दुपारी या प्रकणावर पुन्हा सुनावणी होणार आहे. त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने उद्यापर्यंत तहकूब केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news