Sameer Wankhede : बॉलिवूडला हादरवणाऱ्या समीर वानखेडेंची एनसीबीकडून चौकशी सुरू !

Sameer Wankhede : बॉलिवूडला हादरवणाऱ्या समीर वानखेडेंची एनसीबीकडून चौकशी सुरू !
Published on
Updated on

एनसीबीचा पंच प्रभाकर साईल याने केलेल्या आरोपांनुसार एनसीबीच्या पाच सदस्यीय पथकाने एनसीबी मुंबईचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याकडे चौकशी सुरु केली आहे. वानखेडे यांचा जबाब नोंदविण्यात येत असल्याचे एनसीबीचे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी सांगितले.

मुलगा आर्यन याला सोडण्यासाठी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्याकडे 25 कोटींची मागणी करण्यात आल्याचा आरोपासह पंच प्रभाकर साईल याने समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानुसार एनसीबी महासंचालकांनी नेमलेले पाच सदस्यांची समिती पथक मुंबईत दाखल झाले आहे. एनसीबीचे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्या नेतृत्वाखाली हे पथक या आरोपांची चौकशी करत आहे.

माझे नाव ज्ञानेश्वर वानखेडे…बायको लाडाने दाऊद म्हणायची

क्रूझ पार्टीवर छापा टाकल्यानंतर अडचणीत आलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी धर्मावरून खुलासा केला आहे. माझे नाव ज्ञानेश्वर असून बायको लाडाने दाऊद म्हणायची, असा खुलासा त्यांनी केला आहे. समीर वानखेडे यांनी बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळविल्याचा आरोप नबाब मलिक यांनी केल्यानंतर त्यावरून वादंग उठले आहे. वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामाही मलिक यांनी शेअर केला आहे.

याबाबत समीर यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, माझ्या सर्व्हिस बुकवर ज्ञानदेव वानखेडे अशीच नोंद आहे. समीर आणि त्याच्या पत्नीचे लग्न मुस्लिम पद्धतीने झाले.

काही काळानंतर त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर त्यांचा कायदेशीर पद्धतीनं घटस्फोट झाला. ड्रग्ज प्रकरणाशी माझा, माझ्या जातीचा, धर्माचा, नावाचा काय संबंध? असा प्रतिसवाल त्यांनी केला. समीरच्या आईने त्यावेळी काय सांगितले मला माहीत नाही.

सध्या व्हायरल होत असलेला निकाहनामा खरा असेल तर नेमकं काय झालेय मला माहीत नाही. हा निकाहनामा खरा असेलही. निकाह लागण्यावेळी समीरच्या आईनं काय सांगितलं हे मला माहिती नाही.

हे ही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news