उल्हासनगर : जयंत पाटलांकडून ‘करेक्ट कार्यक्रम’ पप्पू कलानींच्या सुनेसह २२ नगरसेवक राष्ट्रवादीत | पुढारी

उल्हासनगर : जयंत पाटलांकडून 'करेक्ट कार्यक्रम' पप्पू कलानींच्या सुनेसह २२ नगरसेवक राष्ट्रवादीत

उल्हासनगर; पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर मध्ये जयंत पाटलांनी करेक्ट कार्यक्रम करताना भाजपला धक्का दिला आहे. माजी आमदार पप्पू कलानी यांची मुलगी सीमा कलानी, माजी महापौर पंचम कलानी यांच्यासह २२ नगरसेवक आणि १९ माजी नगरसेवक यांनी भाजपला रामराम करीत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

त्यामुळे उल्हासनगर महापालिकेतील सत्तेचे समीकरण बदलले आहे. आता पुन्हा उल्हासनगरवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार असा विश्वास मंत्री आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उल्हासनगरचा दौरा केला होता.

भाजपचे अनेक लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील असा सुतोवाच त्यांनी केले होते. त्यानंतर आज मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाल्याने मंत्री जयंत पाटील आले आणि ‘करेक्ट कार्यक्रम’ करून गेले अशी चर्चा शहराच्या राजकिय वर्तुळात सुरू आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button