Sambar : संभाजीराजे यांच्या नावातूनच सांबार हे नाव पडलं

file photo
file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपण कोणत्याही हाॅटेलात गेलो की, नाष्त्याला दाक्षिणात्य पदार्थ खूपच आवडीने मागवतो. मेदूवडा असो किंवा इडली असो किंवा डोसा असो… हे पदार्थ लोकप्रिय ठरताहेत. पण, या पदार्थांमध्ये जे सांबार (Sambar) मिळतं, ते मूळचं दाक्षिणात्य नाही. हो! विश्वास बसला नाही ना? पण, हे खरं आहे की, सांबार हा अस्सल मराठी पदार्थ आहे आणि त्याचं नाव संभाजी राजेंच्या नावावरून पडलं, याचे संदर्भ इतिहासाच्या पानांमध्ये सापडतात. चला तर 'सांबार' या पदार्थाचं मराठी कनेक्शन काय, ते पाहू…

त्याचं झालं असं की, उत्तर भारतात खाल्ली जाणारी तूरडाळ ही महाराष्ट्राच्या आमटीमध्येही मोठ्या प्रमाणात वापरली जात होती. आता तूरडाळीची आमटी हा प्रमुख खाद्यपदार्थ आहे. इतिहास असं सांगतो की, छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजीराजे यांनी तंजावरपर्यंत मराठी राज्याचा विस्तार केला.

पुढे त्यांची सत्ता व्यंकोजीराजेंची वंशज शहाजीराजांनी संभाळली. याच शहाजीराज्यांच्या कारकिर्दीमध्येच पहिल्यांदा सांबारचा इतिहासाच्या पानांमध्ये उल्लेख सापडतो. हे साहित्य तामीळ भाषेत आहे. त्याची कशा अशी… एकदा शहाजीराजेंनी त्यांचे चूलत बंधू संभाजी यांना जेवणाचे आमंत्रण दिले.

त्यावेळी शाही स्वयंपाकघरात आमसूल संपले होते. दाक्षिणात्य पदार्थांना आमसूल वापरणं ही सामान्य गोष्ट आहे. पण, त्यावेळी ती शिल्लक नव्हती. मग, यावेळी आचाऱ्यांकडून जी आमटी करण्यात आली, त्यात आमसूलऐवजी चिंच वापरण्यात आली. त्यामुळे आंबट-गोड अशी चविष्ट आमटी झाली.

अखेर शाही मेजवानीत राज्यांसमोर ही स्वादिष्ट आमटी आली. आता खास जेवणासाठी आलेले पाहुणे संभाजी राजे होते. त्यांना पदार्थ खूप आवडला. पहिल्यांदाच अशी आमटी संभाजीराजेंना दिल्यामुळे या आमटीला 'संभाजी' असं नाव दिलं. पुढे संभाजी सारम, सांभारम, सांबारम आणि ता थेट सांबार, अशापद्धतीने संभाजी नावाचा अपभ्रंश झाला.

तर मंडळी, आपण मोठ्या आवडीने इडली सांबार, डोसा आणि मेदूवडा खातो. पण, त्यासोबत सांबार नावाचा जो पदार्थ येतो ना… तो अस्सल मराठी पदार्थ आहे. बऱ्याच वेळेला मसाल्यांच्या पदार्थ्यांचा उच्चार झाला की, पोर्तुगिजांनी नाव आठवतं. पण, पोर्तुगिजांकडून पहिल्यांदा मिरची कळली. त्यानंतर भारताला मिरची ओळख देण्यातही मराठेच होते. भारताच्या खाद्यसंस्कृतीत अस्सल मराठीपणा दिसतो.

हेदेखील वाचा…

पहा व्हिडीओ : गरिबांचा बर्गर असणाऱ्या वड्यात 'बटाटा' आला कसा?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news