सलमानची बहिण वाढलेले वजन- सावळ्या वर्णावरून ट्रोल; आयुष शर्मा भडकला

आयुष शर्मा
आयुष शर्मा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खान अनेक वेळा पार्ट्या आणि इव्हेंट्समध्ये स्पॉट होत असते. अलीकडेच अर्पिताने तिच्या घरी खास ईद पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. या पार्टीतील व्हिडिओ पाहून अर्पिताला तिच्या वाढलेले वजन आणि सावळ्या वर्णावरून नेटकऱ्यांकडून ट्रोल केले गेलं. यानंतर अर्पिताचा पती आणि अभिनेता आयुष शर्माने ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

अभिनेता आयुष शर्माने ट्रोल करणाऱ्या नेकऱ्यांना सडेतोड उत्तर देत म्हणाला की, 'प्रत्येक वेळी माझी पत्नी अर्पिताचा फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच तिला वाढलेले वजन आणि सावळ्या वर्णावरून सतत ट्रोल केले जाते. लोकांना असे वाटते की, सेलिब्रिटी असल्याने ती नाजूक आणि गौरी असावी. तर तिचा पोशाख एखाद्या सेलिब्रिटीसारखा असावा. परंतु, मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे कारण, ती जशी आहे तशी मला आवडते. ट्रोल झाल्यानंतर ती त्याकडे अजिबात लक्ष देत नाही किंवा स्वत : ला त्रास करून घेत नाही. तिला हवं तसं ती आयुष्य जगते.'

'अर्पिता मला अनेकदा सांगते की, मी काही सेलिब्रिटी नाही. मी सेलिब्रिटी होण्यासारखे काहीही केलेले नाही. मला कधीही कॅमेऱ्यासमोर जायचे नाही. म्हणूनच मी जिथे आहे तिथे आहे. मला माझ्या अटींवर आयुष्य जगायचे असते.' असे अर्पिता म्ङणत असल्याचा खुलासा आयुषने केला आहे.

अर्पिता खान आणि आयुषने २०१४ मध्ये सात फेरे घेतले. हैदराबादमधील फलकनुमा पॅलेसमध्ये अर्पिताचा मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा पार पाडला. लग्नाच्या काही वर्षानंतर आयुषने २०१८ साली 'लवयात्री' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news