सचिन तेंडुलकरने केले घूमरचे कौतुक…’आर बाल्कीचा घूमर तरुणांना प्रेरणा देणारा’ (Video)

सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकर

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकरने अलीकडेच आर बाल्कीचा चित्रपट घूमर पाहिला आणि अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर स्टारर चित्रपटाबद्दल त्याने कौतुक केलं. सचिनने या चित्रपटाला अत्यंत प्रेरणादायी चित्रपट म्हटले आहे.

त्याच्या नुकत्याच सोशल मीडिया पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणतो- "मी नुकताच घूमर पाहिला आणि हा एक अत्यंत प्रेरणादायी चित्रपट आहे. जोश, इच्छाशक्ती आणि स्वप्न जहाँ भी कैसे अहा " यांना कोणतीच सीमा नाही. कोणतेही लक्ष्य शक्य आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, खऱ्या आयुष्यातही मला हे जाणवले आहे की आयुष्यात चढ-उतार असतात आणि नेमके तेच हा चित्रपट आपल्याला दाखवतो.

परंतु खेळांद्वारे, आपण बरेच धडे शिकतो आणि जेव्हा आपण यशस्वी होता तेव्हा ते नेहमीच असण्याची गरज नाही. अपयश, दुखापती आणि निराशा, ते तुम्हाला आयुष्यात खूप काही शिकवतात आणि याच विषयावर हा चित्रपट आहे. मी तरुणांसाठीही म्हणेन की हा चित्रपट तुम्हाला इतकं शिकवू शकतो की आयुष्यात कधीही हार मानू नका आणि सर्व आव्हानांवर मात करा. आव्हाने येणार आहेत, जीवनाच्या सर्वच पैलूंमध्ये आव्हाने येणार आहेत. वो चॅलेंज को जीतना में ही तो माझा है आणि हेच हा चित्रपट आपल्याला सांगतो."

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news