आटपाडी, पुढारी वृत्तसेवा : करगणी (ता. आटपाडी) येथील सचिन सर्जेराव खिलारी (Sachin Khilari) यांने पॅरिस येथे झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत गोळाफेक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करत नवा आशियाई विक्रम नोंदवला. त्याचबरोबर दर्जेदार कामगिरीसह सुवर्णपदकाला गवसणी घातली.
करगणी येथील दिव्यांग खेळाडू सचिन खिलारीने (Sachin Khilari) गोळाफेक प्रकारात प्रावीण्य मिळवले आहे. अनंत अडचणी आणि प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात करत त्याने नवा आशियाई विक्रम प्रस्थापित केला. आणि आपल्या कामगिरीची सर्वांना दाखल घेण्यास भाग पाडले आहे.
सचिन सध्या पुणे येथील आझम स्पोर्टस् ॲकॅडमीमध्ये प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. चांगल्या कामगिरीच्या जोरावर त्याची पॅरिस येथे सुरू असलेल्या पॅरा ॲथलेटिक्स जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली होती.
या स्पर्धेत सचिनने नवा आशियाई विक्रम नोंदवला. १६.२१ मीटर गोळाफेक त्याने सुवर्णपदक पटकावले. आगामी पॅरा एशियन स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. सचिनला गुलजार शेख, पी. ए. इनामदार यांचे सहकार्य लाभले.
हेही वाचा