सांगली : 86 ग्रा. पं.चे आज अंतिम आरक्षण जाहीर होणार | पुढारी

सांगली : 86 ग्रा. पं.चे आज अंतिम आरक्षण जाहीर होणार

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सांगली जिल्ह्यातील 86 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षणाचे प्रारूप, नमुना ब 26 जूनरोजी सर्व ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय स्तरावर तसेच एनआयसी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. 27 जून ते 3 जुलै या कालावधीमध्ये प्राप्त होणार्‍या हरकती उपविभागीय स्तरावर अभिप्राय घेवून 12 जुलै रोजी अंतिम करून 14 जुलैरोजी अंतिमरीत्या प्रसिद्ध करण्यात येत असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी दिली.

कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी व खानापूर तालुक्यातील भेंडवडे येथील प्रत्येकी एक हरकत प्राप्त झाली होती. त्यापैकी घोरपडी येथील हरकत मान्य करण्यात आली असून, भेंडवडे येथील हरकत अमान्य करण्यात आली आहे. उर्वरित 84 ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण संदर्भात कोणत्याही हरकती हरकत कालावधीमध्ये प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे आयोगाने निश्चित करून दिलेल्या कार्यक्रमानुसार 12 जुलैरोजी जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर मान्यता देवून, तालुकानिहाय एकूण 86 गावांचे अंतिम आरक्षण 14 जुलैरोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

Back to top button