Sabyasachi Mukherjee : अंतर्वस्त्रात मंगळसूत्राच्या जाहिरातीवरून सब्यासाची मुखर्जी वादात

Sabyasachi Mukherjee : अंतर्वस्त्रात मंगळसूत्राच्या जाहिरातीवरून सब्यासाची मुखर्जी वादात
प्रसिद्ध ड्रेस डिझायनर सब्यासाची ( Sabyasachi Mukherjee )  मंगळसूत्राच्या जाहिरातीवरून सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला आहे.  सब्यसाने मंगळसूत्राचा  'इंटिमेट फाईन ज्वेलरी' नावाचा ब्रॅंड सूरू केला आहे. त्याने आपला ब्रॅंड अधिकाधिक लाेकांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी मंगळसूत्रांच्या लेटेस्ट डिझाईनची जाहिरात केली आहे. ते फोटो त्याने इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या जाहिरातीतील फोटोंवरून तो ट्रोल झाला आहे. 

शर्टलेस पुरूष, समलैंगिक जोडपे

सब्यासाने Sabyasachi Mukherjee या जाहिरातीसाठी जे फोटो काढले आहेत. एका फोटोमध्ये अंतर्वस्त्र घातलेल्या मॉडेलने मंगळसूत्र घातले आहे. तर एका फोटोमध्ये समलैंगिक जोडपे दाखवले आहे. तर ब्रा घातलेल्या मॉडेल सोबत शर्टलेस पुरूष आहे. हे फोटो साेशल मीडियावर शेअर होताच नेटकर्यांनी चांगलच धारेवर घेतले आहे.
Sabyasachi Mukherjee जाहिरात मंगळसूत्राची की कामसूत्राची…
ही जाहिरात पाहुन एकजण म्हणत आहे, ही जाहिरात मंगळसूत्राची की कामसूत्राची, जर तुम्हाला जाहिरात करायची असेल तर मंगळसूत्राची करा अंतर्वस्त्राची नको… तर एक नेटकरी म्हणत आहे, 'मी सूरुवातीला जाहिरात पाहिली तेव्हा ही जाहिरात मला अंतर्वस्त्राची वाटली, जेव्हा जाहिरात नीट पाहिली तेव्हा समजलं ही जाहिरात मंगळसूत्राची आहे, असेही एकजण म्हणाला.
सब्यसा हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध ड्रेस डिझायनर आहे. त्याने अनेक सेलिब्रटींचे ड्रेस डिझाईन केले आहेत. त्याचा दागिन्याचाही ब्रॅंडही आहे. यापूर्वीही त्याच्या काही जाहिरातीमूळे ट्रोल झाला आहे.
जाहिरातीची परिभाषा बदलतेय…
व्यावसायिक वेगवेगळ्या आयडिया घेऊन आपल्या उत्पादनाची जाहिरात करत असतात. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करत असतात. जाहिरात फोटो, व्हिडिओ, लेख, गाण्याचा वापर करून आपल्या उत्पादनाची जाहिरात करत असतात. पण जाहिरात कशाची?  का केली आहे, आणि काय सांगायचे आहे? हे ग्राहकांना समजलं नाही तर ट्रोल होण्याची शक्यता असते.

डाबर कंपनीची फेम ब्लीच

नुकतचं डाबर कंपनीच्या फेम या ब्लीचची जाहिरातीला ट्रोल केले गेले, सोशल मीडियावर टिकेची झोड उठली. डाबरने 'करवा चौथ' सणानिमीत्त व्हिडिओ जाहिरात केली होती. यामध्ये समलैंगिक जोडपे दाखवले गेले होते. यामूळे त्यांना टिकेला सामोरे जावे लागले. शेवटी डाबरने ही ॲड सोशल मीडियावरून हटवली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news