मॉस्को (रशिया) : पुढारी ऑनलाईन; रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे प्रमुख नेते किम जोंग उन यांची बुधवारी रशियाचा सुदूर पूर्व प्रदेश अमूरमधील दुर्गम अंतराळ केंद्रात भेट झाली असल्याचे वृत्त सीएनएनने दिले आहे. दोन दिग्गज उभय नेत्यांनी संभाव्य शस्त्रास्त्र करारावर चर्चा केल्याची शक्यता आहे. परिणामी, उत्तर कोरिया युक्रेनशी सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाला शस्त्रे पुरवणार असल्याचे समजते. (Kim and Putin Meet)
व्लादिमीर पुतिन आणि किम जोंग उन बुधवारी रशियाच्या अंतराळ रॉकेट प्रक्षेपण साइट वोस्टोचनी कॉस्मोड्रोम येथे दाखल झाले. सीएनएनने पुढे वृत्तात म्हटले आहे की इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केले आणि त्यांच्यात काही वेळ चर्चा झाली. व्हिडिओ फुटेजमध्ये किम जोंग उन काळ्या रंगाच्या कारमधून बाहेर पडताना आणि पुतिन यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसले आहेत.
क्रेमलिनने जारी केलेल्या व्हिडिओनुसार, पुतिन यांनी किम यांना, "हाय! तुम्हाला भेटून आनंद झाला. तुमचा प्रवास कसा झाला?" असे विचारले. त्यावर किम जोंग उन म्हणाले, "तुम्ही कामात व्यस्त असताना तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून आमंत्रित केले आमंत्रित केल्याबद्दल आणि आमचे स्वागत केल्याबद्दल धन्यवाद", असे सीएनएनने वृत्तात म्हटले आहे. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी अंतराळ केंद्रात प्रवेश केला. पुतीन यांच्याशी चर्चा सुरू होताच किम यांनी म्हटले आहे की, "मी नेहमीच रशियाच्या पाठीशी उभा राहीन."
सध्या दोन्ही नेते व्होस्टोचनी कॉस्मोड्रोमच्या दौऱ्यावर आहेत, असे CNN ने रशियाच्या सरकारी मालकीच्या मीडियाचा हवाला देत वृत्त दिले आहे. या व्हिडिओमध्ये किम जोंग उन उत्तर कोरियाहून आलेल्या ग्रीन ट्रेनमधून उतरताना आणि रिमोट व्होस्टोचनी कॉस्मोड्रोम स्पेस सेंटरमध्ये आल्याचे दाखवले आहे.
या फुटेजमध्ये उत्तर कोरियाचे नेते किम जोंग ट्रेनमधून बाहेर पडताना आणि ट्रेनमधील अनेक रशियन अधिकाऱ्यांशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत. किम जोंग उन मंगळवारी रशियात पोहोचले होते, अशी माहिती सीएनएनने रशियातील मीडियाच्या हवाल्याने दिली होती. दोन्ही नेते शस्त्रास्त्र करार करू शकतात अशी शक्यता अमेरिकेने व्यक्त केली होती. अशातच किम जोंग उन यांची शस्त्रास्त्रांनी भरलेली खासगी ट्रेन रशियामध्ये दाखल झाली.
ही ट्रेन देशाच्या सुदूर पूर्व भागातील प्रिमोर्स्की क्राई मार्गे उत्तरेकडे गेल्याचे वृत्त रशियातील सरकारी वृत्तसंस्था आरआयएचा हवाला देत पुढे आले होते. दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, किम जोंग मंगळवारी पहाटे रशियात दाखल झाले होते.
रशिया टुडेने सोमवारी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की ही ट्रेन किम यांना रशियन-उत्तर कोरियाच्या सीमेजवळ तुमेन नदीजवळ घेऊन जात होती. दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते जिओन हा-क्यू यांनी सांगितले की उत्तर कोरिया आणि रशिया शस्त्रास्त्र करार आणि तंत्रज्ञानाबाबत द्विपक्षीय वाटाघाटी करतील की नाही यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. (Kim and Putin Meet)
किम जोंग उन यांचा रशियाचा दौरा हा COVID-19 नंतरचा त्यांचा हा पहिला परदेश दौरा आहे,. कारण कोरोना काळात उत्तर कोरियाच्या सीमा सील करण्यात आल्या होत्या.
हे ही वाचा :