

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी सर्वोच्च जनरलची हकालपट्टी केली आहे. त्यांनी युद्धाच्या तयारीसाठी शस्त्रे तयार करण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर कोरियामध्ये युद्ध होण्याची शक्यता आहे, ज्यासाठी देशाने मोठ्या प्रमाणावर तयारी, शस्त्रास्त्रांचे उत्पादन वाढवणे आणि लष्करी सरावांचा विस्तार करण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक मीडिया केसीएनए या वृत्तसंस्थेने गुरुवारी (दि.१०) याबाबतचे वृत्त दिले आहे. (Kim Jong Un)
या वृत्तात म्हटले आहे की किम यांनी केंद्रीय लष्करी आयोगाच्या बैठकीत ही माहिती दिली, ज्यात उत्तर कोरियाच्या शत्रूंना रोखण्यासाठी बदला घेण्याच्या योजनांवर चर्चा करण्यात आली. ज्याचा तपशील अद्याप उघड झालेला नाही. मीडिया एजन्सी KCNA ने तपशील न देता सांगितले की जनरल री योंग गिल यांना लष्कराचे सर्वोच्च जनरल, चीफ ऑफ द जनरल स्टाफ पाक सू इल यांच्या जागी नियुक्त केली आहे.
अहवालात तपशील न देता म्हटले आहे की किम यांनी शस्त्रे उत्पादन क्षमता वाढविण्याचे देखील उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या आठवड्यात त्याने शस्त्रास्त्र कारखान्यांना भेट दिली जिथे त्याने अधिक क्षेपणास्त्र इंजिन, तोफखाना आणि इतर शस्त्रे मागवली आहेत.
युक्रेनमधील युद्धासाठी रशियाला तोफखाना, रॉकेट आणि क्षेपणास्त्रांसह शस्त्रे पुरवल्याचा आरोप अमेरिकेने उत्तर कोरियावर केला आहे. रशिया आणि उत्तर कोरियाने हे दावे फेटाळले आहेत. किमने आपल्या सैन्याला युद्धासाठी सज्ज ठेवण्यासाठी देशाच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि उपकरणांसह कवायतींचे आवाहन केले असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
हेही वाचा