पुतिन यांच्‍या विरुद्ध बंड करणारे प्रिगोझिन जिवंत! व्‍हायरल व्‍हिडिओने खळबळ | पुढारी

पुतिन यांच्‍या विरुद्ध बंड करणारे प्रिगोझिन जिवंत! व्‍हायरल व्‍हिडिओने खळबळ

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्‍याविरोधात बंडाचा झेंडा फडकविणारे वॅग्नर ग्रुपचे (wagner chief)  प्रमुख येवगेनी प्रिगोझिन हे जिवंत असल्‍याचा दावा करणारा एका व्‍हिडिओ व्‍हायरल झाला आहे. युक्रेनच्या अंतर्गत व्यवहार मंत्र्यांचे सल्लागार अँटोन गेराश्चेन्को यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. प्रिगोझिन यांचा विमान अपघातात मृत्‍यू झाल्‍याचे जेनेटिक (जनुकीय) चाचण्‍यांनी पुष्‍टी केली असल्‍याचे रशियन गुन्‍हे अन्‍वेषण विभागाने म्‍हटले होते. यानंतर ते जिवंत असल्‍याचा दावा करणारा व्‍हिडिओ  व्‍हायरल झाल्‍याने खळबळ उडाली आहे.

wagner chief प्रिगोझिन आफ्रिकेत ?

एका टेलिग्राम चॅनेलने प्रसिद्ध केलेल्या छोट्या क्लिपमध्ये प्रिगोझिन हे आफ्रिकेत असल्‍याचे दिसते. ते लष्‍कराच्‍या गणवेष व टोपी घातलेला दिसतात. तसेच त्‍यांच्‍या उजव्या हाताला घड्याळही बांधले आहे. हा व्हिडिओ चालत्या वाहनात चित्रित करण्यात आला आहे. तथापि, रॉयटर्सच्या अहवालानुसार, त्याचे कपडे 21 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये दर्शविलेल्या देखाव्याशी जुळतात. हा व्हिडिओ आफ्रिकेत चित्रित करण्यात आल्याचे वॅगनर प्रमुखांचा दावा आहे. यामध्‍ये प्रिगोझिन म्‍हणत आहेत की, “मी जिवंत आहे की नाही, मी काय करत आहे यावर चर्चा करत आहेत. आज वीकेंड आहे, ऑगस्ट 2023 च्या उत्तरार्धात, मी आफ्रिकेत आहे. त्यामुळे ज्यांना मला संपवायचे आहे त्यांना चर्चा करायला आवडते. ते सर्व ठीक आहे.”

साेशल मीडियावर मोठी चर्चा

या क्लिपमुळे एक्स ( पूर्वीचे ट्विटर) वर मोठी चर्चा रंगली आहे. युक्रेनच्या अंतर्गत व्यवहार मंत्र्यांचे सल्लागार अँटोन गेराश्चेन्को यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. आम्ही प्रीगोझिनच्या मृत्यूपासून त्याच्या आणखी व्हिडिओंची अपेक्षा करत आहोत. ते आता ठीक आहेत, असेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

रविवारी रशियाच्‍या सूत्रांनी सांगितले होते की, बुधवार २३ ऑगस्‍ट रोजी मॉस्कोच्या वायव्येकडील टव्हर प्रदेशात खासगी जेट विमान कोसळले होते. यामध्‍ये वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांच्‍यासह १० जण प्रवास करत होते. विमान अपघातात या सर्वांचा मृत्‍यू झाला आहे. मृतांमध्‍ये प्रिगो्रजन यांचा निकटवर्ती दिमित्री उत्किन याचाही समावेश होता.अपघातात मृत्‍युमुखी पडेलेल्‍या सर्व १० मृतांची ओळख पटली आहे, असे रशियाच्‍या तपास समितीने म्‍हटले होते.

बंडानंतर दोन महिन्‍यातच प्रिगोझिन यांचा विमानाला अपघात

वॅग्नर ग्रुप हा रशियातील खासगी सैन्‍य आहे. याचा प्रमुख येवगेनी प्रिगोझिन हे एकेकाळी पुतिन यांचे सर्वात निकटवर्ती मानले जात. पुतिन यांच्‍या हट्‍टामुळे युक्रेन युद्‍ध सुरु झाले. या युद्‍धाला दीड वर्ष झाले तरी ठोस निर्णय झालाच नाही. यानंतर रशियात पुतिन यांच्‍या नेतृत्त्‍वाविरोधात सूर उमटत असल्‍याची चर्चा पाश्‍चात्‍य माध्‍यमातून होत होती. यानंतर प्रिगोझिन यांनी बंडाची घोषणा केली आणि जगभरात खळबळ माजली. आता रशियाचे पुन्‍हा तुकडे होणार, युक्रेनचे युद्‍ध थांबवणार असे अशी अनेक विश्‍लेषण करण्‍यात येवू लागली. मात्र प्रिगोझिन यांचे बंड औटघटकेचे म्‍हणजे केवळ काही तासांचे ठरले. प्रिगोझिन यांनी तलवार म्‍यान करत पुतिन यांना शरण गेले. त्‍याचचेळी अनेकांनी त्‍यांच्‍या भविष्याबद्दल शंका व्‍यक्‍त केली होती. यानंतर अवघ्‍या दोन महिन्‍यात बुधवार २३ ऑगस्‍ट रोजी विमान अपघातात प्रिगोझिन यांचा मृत्‍यू झाल्‍याचा दावा रशियाने केला आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button