पुढारी ऑनलाईन ; रशिया युक्रेनमध्ये युद्ध अजुनही सुरूच आहे. दरम्यान (गुरूवारी) रशियाने युक्रेनच्या अनेक भागात जोरदार हल्ले चढवले. यामध्ये हल्ल्यात तब्बल ५१ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे.
गुरुवारी रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला. रशियन सैन्याने पूर्व युक्रेनमधील ह्रोझा गावावर रॉकेट डागले आणि तेथील कॅफे आणि स्टोअरमध्ये उपस्थित किमान 51 नागरिक ठार झाले. तेथे अनेक जण जखमी झाले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी या हल्ल्यासाठी रशियाला जबाबदार धरले आहे.
युक्रेनचे अंतर्गत व्यवहार मंत्री इहोर क्लिमेंको यांनी सांगितले की; हल्ल्याच्या वेळी कॅफेमध्ये सुमारे 60 लोक होते, जे अंत्यसंस्कारानंतर प्रार्थनेसाठी उपस्थित होते. झेलेन्स्कीचे चीफ ऑफ स्टाफ आंद्री येरमाक आणि खार्किवचे गव्हर्नर ओलेह सिनिहुबोव्ह यांनी सांगितले की, मृतांमध्ये एका 6 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे.
हेही वाचा :