रशियाकडून युक्रेनच्या सैन्याला तत्काळ शस्त्रे ठेवण्याचा आदेश !

रशियाकडून युक्रेनच्या सैन्याला तत्काळ शस्त्रे ठेवण्याचा आदेश !

कीव्ह; पुढारी ऑनलाईन : रशियाने युक्रेनच्या लष्कराला तत्काळ शस्त्रे खाली ठेवण्यास सांगितले आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. त्याचवेळी, त्यांनी कब्जा केलेल्या मारियुपोल शहराला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या युक्रेनियन सैनिकांना प्रतिकार करणे थांबवण्याचा अंतिम इशारा दिला आहे. रशियन संरक्षण मंत्री, युक्रेनची राजधानी, कीव्ह येथे संबोधित करताना, "त्यांच्या सैनिकांना अनावश्यक प्रतिकार थांबवण्याचे आदेश द्या" असे आवाहन केले.

त्यांनी असेही म्हटले की मारियुपोलचे बचावकर्ते दुपारपर्यंत शस्त्रे ठेवल्यास "निश्चितपणे जिवंत" राहतील.

यापूर्वी असे वृत्त आले होते की युक्रेनची राजधानी कीव्हमधील अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, रशियाने पूर्व युक्रेनमध्ये मोठा हल्ला सुरू केला आहे. राजधानी कीव्ह काबीज करण्यात अयशस्वी झाल्यानंतर रशियाच्या हल्ल्याच्या नवीन टप्प्याची ही सुरुवात झाली. येत्या आठवड्यात, रशियाच्या लष्करी कारवाया पुन्हा पूर्व युक्रेनच्या डोनबास प्रदेशावर लक्ष केंद्रित करतील, २०१४ पासून अंशतः रशियन-समर्थित फुटीरतावाद्यांनी नियंत्रित केले आहे.

रशियाने न्यूक्‍लियर बॉम्बर आणले युक्रेनच्या सीमेवर

रशिया-युक्रेन युद्धाला 50 हून अधिक दिवस उलटून गेले असूनही युद्धाचा शेवट द‍ृष्टिपथात दिसत नसल्याने आता युद्धात अण्वस्त्र हल्ल्याचा धोका वाढत चालला आहे. ताज्या माहितीनुसार रशियाने युक्रेनच्या सीमेवर त्यांचे टीयू-160 हे न्यूक्‍लियर बॉम्बर दिसल्याची माहिती आहे. या जेट्सचा वापर अणुबॉम्ब नेण्यासाठी केला जातो.

त्यामुळे, आता जगावर अणुयुद्धाच्या काळजीची छाया दाटू लागली आहे. रशियाने डोनेस्टक भागात गेल्या 24 तासांत 9 वेळा हल्ले केले आहेत. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. लीव्ह शहरात रशियाने 5 शक्‍तिशाली आणि घातक क्षेपणास्त्रे डागली आहेत. यात सात जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले आहेत. डोनबास येथे 10 रशियन रणगाडे नष्ट केल्याचे युक्रेनने म्हटले आहे. डोनबासचा पूर्व भाग रशियाला उद‍्धवस्त करायचा असल्याचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

युक्रेनी नागरिकांची परदेशातून घरवापसी युद्धाला दीड महिना उलटल्यानंतर आता युक्रेनमधील काही शहरांची परिस्थिती सुधारत असल्याने दररोज 30 हजारांवर युक्रेनी नागरिक पुन्हा देशात परतत असल्याची माहिती येथील संयुक्‍त राष्ट्राच्या मानवाधिकार विभागाने दिली आहे.

हे ही वाचलं का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news