धक्‍कादायक..! महान बुद्धिबळपटू कास्पारोव्ह यांना रशियाने केले दहशतवादी घोषित

रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष व्लादिमीर पुतिन, दुसर्‍या छायाचित्रात महान बुद्धिबळपटू गॅरी कास्‍परोव. ( संग्रहित छायाचित्र )
रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष व्लादिमीर पुतिन, दुसर्‍या छायाचित्रात महान बुद्धिबळपटू गॅरी कास्‍परोव. ( संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : रशियाने महान बुद्धिबळपटू आणि राजकीय कार्यकर्ते गॅरी कास्‍परोव यांच्‍या नावाचा समावेश दहशतवादी यादीत केला आहे. रशियाची आर्थिक देखेरख संस्‍था 'रोसफिन'ने याची घोषणा केली आहे. दहशतवादी यादीत समावेश असलेल्‍या व्‍यक्‍तींना बॅक व्‍यवहार करण्‍यास प्रतिबंध केला जातो. तसेच या यादीत समावेश असलेल्‍या व्‍यक्‍तींशी आर्थिक व्‍यवहार करताना रशियाच्‍या अर्थ विभागाची परवानगी घेणे आवश्‍यक असते.

६० वर्षीय जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन गॅरी कास्‍परोव हे मागील काही वर्ष रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्‍यावर टीका करणार्‍यांपैकी एक आहेत. रशियाने युक्रेनवर केलेल्‍या हल्‍ल्‍याचाही त्‍यांनी सातत्याने निषेध केला आहे.

२०१४ मध्‍ये रशियातून पलायन

सरकारच्‍या दडपशाहीमुळे कास्पारोव्ह यांनी २०१४ मध्‍ये रशियातून पलायन केले हाेते. सध्‍या त्‍यांचे वास्‍तव्‍य अमेरिकेत आहे. कास्पारोव्ह हा जगातील सर्वोत्कृष्ट बुद्धिबळपटूंपैकी एक मानला जातो. राजकारणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ते जवळजवळ दशकभर अमेरिकेत वास्तव्यास आहेत. आता रशियाने त्‍यांचा उल्‍लेख 'परकीय एजंट' असा केला आहे. रशियामध्‍ये हा शब्द देशाच्‍या शत्रूसाठी वापरला जाताे.

युक्रेनला दिला होता पाठिंबा

२२ फेब्रुवारी २०२२ मध्‍ये रशियाने युक्रेनवर हल्‍ला केला होता. यावेळी कास्‍पारोव्‍ह यांनी रशियाच्‍या कृतीचा निषेध केला होता. रशियामध्ये लोकशाही बदल घडवून आणण्यासाठी युक्रेनने मॉस्कोला पराभूत करण्याची गरज असल्याचेही ते या वेळी म्हणाले होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news