पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर आज (दि.०७) पहिल्यांदाच श्रीनगरच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, ते श्रीनगर येथील बक्षी स्टेडियमवरील 'विकसित भारत, विकसित जम्मू काश्मीर' कार्यक्रमत सहभागी झाले. यावेळी त्यांनी जम्मू काश्मीरमधील कृषी आणि पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध ६,४०० कोटींच्या ५३ प्रकल्पांचे लोकार्पण केले. तसेच हे विकास प्रकल्प पीएम मोदींनी देशाला समर्पित केले. (PM Modi Kashmir Visit)
श्रीनगरच्या बक्षी स्टेडियममधील रॅलीमध्ये पीएम नरेंद्र मोदींनी ५३ योजनांचे उद्घाटन केले. ज्यात 'देखो अपना देश पीपल्स चॉइस टुरिस्ट डेस्टिनेशन पोल', 'चलो इंडिया ग्लोबल डायस्पोरा कॅम्पेन' आणि '२.५ लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याचे' उद्दिष्ट असलेल्या समग्र कृषी विकास कार्यक्रमाचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीरमधील कृषी अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या ५ हजार कोटीचा कृषी विकास कार्यक्रम देशाला समर्पित केला. तसेच श्रीनगरच्या 'हजस्तवत श्राइनचा एकात्मिक विकास प्रकल्पासह स्वदेश दर्शन आणि प्रसाद अंतर्गत १,४०० कोटी रुपयांहून अधिक किमतीचे पर्यटन क्षेत्राशी संबंधित अनेक प्रकल्पांचे पीएम मोटीच्या हस्ते आज (दि.७) लोकार्पण झाले. (PM Modi Kashmir Visit)
हेही वाचा: