इंग्‍लंड विरुद्धच्‍या कसोटी सामन्‍यात रोहित शर्मा खेळणार? राहुल द्रविड यांचे मोठे विधान

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
इंग्‍लंड विरुद्धच्‍या कसोटीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा खेळणार का? या प्रश्‍नावर टीम इंडियाचे मुख्‍य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मोठे विधान केले आहे. इंग्‍लंडमधील रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली होती. त्‍यामुळे इंग्‍लंडविरोधाच्‍या मालिकेतील  कसोटी सामन्‍यात रोहित शर्मा खेळणार नाही, अशी चर्चा सुरु झाली होती. याबाबत पत्रकार परिषदेत राहुल द्रविड यांनी आपली भूमिका स्‍पष्‍ट केली.

काेराेना चाचणी अहवालानंतरच फैसला

यावेळ द्रविड म्‍हणाले की, आमचे वैद्‍यकीय पथकाचे रोहितच्‍या प्रकृतीकडे लक्ष आहे. कसोटी सामन्‍यापूर्वी त्‍याची कोरोना चाचणी निगेटिव्‍ह येणे आवश्‍यक आहे. आमचे त्‍याच्‍या प्रकृतीवर लक्ष आहे. त्‍याची पुन्‍हा एकदा कोरोना चाचणी घेतली जाईल. यानंतर तो कसोटी सामन्‍यात खेळणार का, याचा फैसला होणार आहे.

भारताने लीसेस्‍टरशॉअर विरोधात खेळलेला सामना अर्निणीत राहिला आहे, दरम्‍यान, इंग्‍लडने न्‍यूझीलंडविरोधातील तीन कसोटी सामन्‍यात ३-० असा विजय मिळवला आहे. रोहित शर्मा  या सामन्‍यासाठी उपलब्‍ध नसल्‍यास भारतीय संघाचे नेतृत्त्‍व जसप्रीत बुमराह याच्‍याकडे सोपवले जाईल का?.  या प्रश्‍नावर द्रविड म्‍हणाले की, रोहित शर्मा कसोटीत खेळणार की नाही हे स्‍पष्‍ट झाल्‍यानंतर आम्‍ही याबाबत निर्णय घेवू.

मागील काही महिने आम्‍ही चांगले क्रिकेट खेळले

मी जेव्‍हा भारतीय संघाचे मुख्‍य प्रशिक्षक म्‍हणून कार्यभार स्‍वीकारला तेव्‍हा पुढील ६ ते ७ महिन्‍यांमध्‍ये अनेकांना कर्णधारपदाची जबाबादारी पार पाडावी लागेल, याचा विचारही केला नव्‍हता. कारण काही खेळाडूंना दुखापत झाली आहे. मागील तीन आठवड्यांमध्‍ये केएल राहुल आणि रोहित शर्मा यांच्‍याबाबत जे काही झालं हे दुर्देवी आहे. मागील काही महिने आम्‍ही चांगले क्रिकेट खेळले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्‍धच्‍या मालिकेत आमचे प्रदर्शन चांगले होते, असेही द्रविड यांनी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news