BCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदासाठी रॉजर बिन्नी यांचे नाव चर्चेत

BCCI President Election : बीसीसीआय अध्यक्षपदासाठी रॉजर बिन्नी यांचे नाव चर्चेत
Published on
Updated on

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळला (BCCI President Election) नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने २०१९ मध्ये अध्यक्षपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. मात्र, आता ते पद सोडणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत राज्य संघटनांच्या प्रतिनिधींची यादी आली आहे. यामध्ये काही आश्चर्यकारक नावांचा समावेश आहे.

या यादीतील काही व्यक्ती या बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. यात भारताचे माजी खेळाडू रॉजर बिन्नी यांचादेखील समावेश आहे. रॉजर बिनी हे बीसीसीआयचे नवे अध्यक्ष होऊ शकतात. या यादीत अभिषेक दालमिया यांचे नाव नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयमध्ये पदासाठी त्यांची देखील दावेदारी होती. बंगाल संघाकडून सौरभ गांगुली यांचे प्रतिनिधी म्हणून नाव आहे. त्यामुळे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगनमोहन दालमिया यांचा मुलगा बीसीसीआय अध्यक्ष होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

रॉजर बिन्नी यांची कारकीर्द

अष्टपैलू रॉजर बिन्नी यांनी १९७९ ते १९८७ मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यादम्यान त्यांनी २७ कसोटी सामने खेळले असून ८३० धावा केल्या आहेत. तर ७२ एकदिवसीय सामन्यात ६२९ धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये पाच तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक अर्धशतक झळकावले आहे.

रॉजर बिन्नीने २७ कसोटीमध्ये ४७ विकेट्स घेतल्या आहेत. तर एकदिवसीय सामन्यात 77 विकेट्स घेतल्या आहेत. रॉजर बिन्नी यांचा १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी हाेते. या विश्वचषकात त्यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या.

१८ ऑक्टोबरला निवडणूक होणार (BCCI President Election)

बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी १८ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. मुंबईत ही निवडणूक होणार असून, त्यापूर्वी ११ आणि १२ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करतील, त्यानंतर १३ ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. १४ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून त्यानंतर दोनपेक्षा जास्त दावेदार असल्यास १८ ऑक्टोबर रोजी मतदानाची बाब समोर येत आहे. दरम्यान, टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली पुन्हा अध्यक्ष होण्याच्या मनस्थितीत नसल्याचे इंडिया टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने कळवले आहे.

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत गांगुली निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय झाल्याचे एका वृत्तसंस्थेने आपल्या वृत्तात म्हटले आहे. तसेच या बैठकीला उपाध्यक्ष राजीव शुक्ला, खजिनदार अरुण धुमल आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन या बैठकीला हजर होते.

जय शाह बीसीसीआयच्या सचिवपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत राज्य संघटनांच्या प्रतिनिधिंची यादी आली आहे. यामध्ये काही आश्चर्यकारक नावांचा समावेश आहे. या यादीतील काही व्यक्ती या बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. यात भारताचे माजी खेळाडू रॉजर बिनी यांचादेखील समावेश आहे.

कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने संतोष मेनन यांच्या जागी रॉजर बिन्नी यांचे नाव दिले आहे. हा सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का आहे. रॉजर बिन्नी कर्नाटक क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news