Robin Uthappa : उथप्पाची क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती

Robin Uthappa
Robin Uthappa
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. आज (दि. 9) रॉबिन उथप्पाने सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली. उथप्पा हा 2007 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग होता.

2007 साली झालेल्या T-20 विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाचा भाग असलेल्या रॉबिन उथप्पाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 14 सप्टेंबर रोजी रॉबिन उथप्पाने सोशल मीडियाच्या माध्यमातून याची घोषणा केली. विशेष बाब म्हणजे 14 सप्टेंबर रोजी 2007 च्या विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्याला 15 वर्षे पूर्ण झाली, ज्यामध्ये रॉबिन उथप्पाने भारताला बॅलआउटमध्ये पाकिस्तानचा त्रिफळा उडवण्यात महत्वाची कामदगिरी केली होती.

रॉबिन उथप्पाने आपल्या पोस्ट लिहिले आहे की, आपल्या देशाचे आणि कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करणे हा त्याच्यासाठी मोठा सन्मान होता. प्रत्येक चांगल्या गोष्टीचा अंत होतो, मी भारतीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून माझी निवृत्ती जाहीर करत आहे.रॉबिन उथप्पाने संदेशही लिहिला आहे, ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की, गेल्या 20 वर्षांपासून तो आपल्या राज्याचे, देशाचे विविध स्तरांवर प्रतिनिधित्व करत आहे, हा एक अद्भुत प्रवास होता, ज्यामध्ये अनेक चढ-उतार आले. या दरम्यान मी माणूस म्हणून खूप काही शिकण्याचा प्रयत्न केला.

रॉबिन उथप्पाने 2006 साली भारतासाठी वनडेमध्ये पदार्पण केले, त्याने एकूण 46 एकदिवसीय सामने खेळले. यामध्ये 25.94 च्या सरासरीने 934 धावा केल्या. रॉबिन उथप्पाने 6 वनडे अर्धशतकेही ठोकली. तसेच, रॉबिन उथप्पाने भारतासाठी 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 24.90 च्या सरासरीने 249 धावा केल्या. रॉबिनने भारताकडून शेवटचा सामना 2015 मध्ये खेळला होता, तेव्हा त्याची झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी निवड झाली होती.

आयपीएलबद्दल बोललो तर रॉबिन उथप्पा हा तेथे यशस्वी फलंदाज ठरला. त्याचे नाव सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समाविष्ट आहे. रॉबिनने आयपीएलमध्ये एकूण 205 सामने खेळले आहेत. त्याने 27.51च्या सरासरीने 4952 धावा केल्या. रॉबिन उथप्पाने आयपीएलमध्ये २७ अर्धशतके झळकावली आहेत. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, राजस्थान रॉयल्स या संघांसाठी खेळला आहे.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news