साधूंना मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करा: विलासराव जगताप | पुढारी

साधूंना मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करा: विलासराव जगताप

जत: पुढारी वृत्तसेवा : लवंगा (ता.जत) येथे वाराणसीतील साधूंना झालेल्या मारहाणीचा जाहीर निषेध करत आहे. या साधूंना मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भाजपचे माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते विलासराव जगताप यांनी केली.

जगताप म्हणाले, जत तालुक्यातील लवंगा येथे झालेली घटना ही जत तालुक्याला काळिमा फासणारी घटना आहे. साधु, संत येती घरा त्याच्या घरी नित्य दिवाळी दसरा, आपल्या संस्कृतीमध्ये साधूंना अन्यसाधारण महत्व आहे. साधूच्या वेशात मुले पळवणारी टोळी आली समजून विजापूरहून येणाऱ्या साधूंची गाडी अडविणे, कोणतीही खातरजमा न करता त्यांना जबर मारहाण करणे, त्यांना कोंडून ठेवणे हे आपणास शोभते का?, काही जणांच्या या कृत्यामुळे संपूर्ण जतकरांना शरमेने मान खाली घालण्याची वेळ आली आहे.
या प्रकरणातील दोषींचा कोणताही मुलाहिजा न ठेवता त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार जगताप यांनी दिला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button