‘त्‍या’ भयंकर रात्रीला वर्ष झालं! ऋषभ पंत पुनरागमनासाठी सज्ज; दिल्ली कॅपिटल्सने शेअर केला भावनिक व्हिडिओ

३० डिसेंबर २०२२ रोजी टीम इंडियाचा यष्‍टीरक्षक ऋषभ पंत भीषण कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. आता तो पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.
३० डिसेंबर २०२२ रोजी टीम इंडियाचा यष्‍टीरक्षक ऋषभ पंत भीषण कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. आता तो पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आज ३० डिसेंबर. मागील वर्षी म्‍हणजे ३० डिसेंबर २०२२ हा दिवस टीम इंडियाचा यष्‍टीरक्षक ऋषभ पंत याच्‍यासाठी अत्‍यंत भीषण ठरला. याच दिवशी त्‍याच्या कारला मोठा अपघात झाला. सुदैवाने तो बचावला. शनिवारी (30 डिसेंबर) या अपघाताला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सने एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. दिल्ली कॅपिटल्सने म्‍हटलं आहे की, ऋषभ धमाकेदार पुनरागमनासाठी सज्‍ज आहे. ( Rishabh Pant Ready to Comeback )

Rishabh Pant Ready to Comeback : 'त्या' भयंकर रात्रीला ३६५ दिवस झाले….

दिल्ली कॅपिटल्सने 'इंस्‍टा'वर शेअर केलेल्‍या व्हिडिओमध्‍ये म्‍हटलं आहे की, "त्या भयंकर रात्रीपासून ३६५ दिवस उलटले आहेत. तेव्हापासून, कृतज्ञता, विश्वास, स्वत:ची काळजी, कठोर परिश्रम आणि कधीही हार न माणण्‍याची वृत्ती ऋषभ पंतच्‍या नसांमध्‍ये असल्‍याने ती दररोज खेळात जोरदार पुनरागमन करते. पुन्हा एकदा गर्जना करत पुनरागमन करण्याच्या दिशेने कधीही न सोडणारा दृष्टीकोन हा कायम आहे."

डेव्हिड वॉर्नर, अक्षर पटेल, रिकी पाँटिंग आणि सौरव गांगुली यांनी दिल्ली कॅपिटल्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ऋषभ पंत याच्‍या बद्‍दल त्यांचे मत व्यक्त केले आहे.

Rishabh Pant Ready to Comeback : तो लढणार हे मला माहीत होते : अक्षर

टीम इंडियाचा क्रिकेटपटू अक्षर पटेल याने ३० डिसेंबर २०२२ राेजी सकाळी त्‍याला आलेला अनुभव शेअर केला आहे. त्‍याने म्‍हटलं आहे की, " ३० डिसेंबर २०२२ च्‍या सकाळी सात किंवा आठ वाजता मला प्रतिमादीदींनी फोन केला. मला विचारले की, तू ऋषभशी शेवटचे कधी बोलला आहेस. मी उत्तर दिले की, मी त्याला कॉल करणार आहे; पण त्‍यांनी माझ्‍याकडे ऋषभच्या आईचा फोन नंबर मागितला. मला वाटलं खूपच भयंकर काही तरी झालं आहे. बीसीसीआय आणि शार्दुलसह सर्वांनी मला फोन केले. कारण ऋषभचे माझ्याशी शेवटचे बोलणे झाले असेल, असे सर्वांना माहीत होते. मी ऋषभशी बोललो. फोन केल्यावर कळलं की सगळं ठीक आहे. त्याला दुखापत झाली आहे. यानंतर माझ्या जीवात जीव आला. तो आता लढणार हे मला माहीत होतं."

३० डिसेंबर २०२२ रोजी झाला होता भीषण अपघात

30 डिसेंबर 2022 रोजी ऋषभ पंत आपल्‍या कारने घरी जात होता. कारमध्‍ये तो एकटाच होता. रुरकीच्या नरसन सीमेवर हम्मादपूर झालजवळ त्यांचे मर्सिडीज कारवरील नियंत्रण सुटले. कार जोरात रेलिंगला धडकली. यानंतर कारने पेट घेतला आणि उलटली. ऋषभला डुलकी लागल्‍याने त्याचे कार नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेली कार प्रथम दुभाजकावर आदळली. यानंतर लोखंडी बॅरिकेडिंगला धडकली. सुमारे 200 मीटर अंतरावर जावून थांबल्‍यानंतर आग लागली. आग लागण्यापूर्वी ऋषभ पंत स्वत: गाडीची काच फोडून बाहेर आला. त्‍याच्‍या डोक्याला, पाठीवर आणि पायाला गंभीर जखमा झाल्‍या होत्‍या.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news