दिल्ली; पुढारी ऑनलाईन : भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत सध्या रुग्णालयात दाखल आहे. उत्तराखंडमधील रुडकीजवळ ३० डिसेंबरला सकाळी त्याच्या कारचा अपघात झाला. तेव्हापासून त्यांच्यावर डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या ऋषभ पंतला भेटण्यासाठी सिनेतारकांपासून ते क्रीडा जगतापर्यंतच्या चाहत्यांची रिघ लागली आहे. (Rishabh Pant Health Update)
अत्यंत भीषण अशा अपघातात केवळ दैवबलवत्तर म्हणूनच ऋषभ पंत वाचला गेला. यावेळी रजत आणि निशू यांनी पंतला त्याच्या कारमधून बाहेर काढले. या दोघांनी ऋषभपंतला एक प्रकारे जीवनदान दिले. ऋषभला जीवनदान देणारे रजत आणि निशू या दोघांनी आज मॅक्स रुग्णालयात ऋषभची भेट घेतली. (Rishabh Pant Health Update)
रजत आणि निशू यांनी सांगितले की, कार अपघातानंतर ऋषभ पंतच्या अंगावरील कपडे फाटले होते. तेव्हा रजत आणि निशूनेच त्यांची शॉल पंतला दिली होती. यानंतर दोघांनी ऋषभ पंतला रुग्णवाहिकेतून रुडकी येथील रुग्णालयात घेऊन गेले. पंत यांच्यावर तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. (Rishabh Pant Health Update)
रजत आणि निशू यांनी ऋषभची भेट घेतल्यानंतरचा एक फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये रजत आणि निशू हे दोघे दिसत आहेत. त्यांच्या सोबतच ऋषभ पंतची आई सरोज या सुद्धा दिसत आहे. तसेच या फोटोत पंतचे हात दिसत आहेत. त्याच्या डाव्या हाताला सलाईन लावलेली दिसत आहे.
पंतला भेटणाऱ्याकडूनच मिळत आहे माहिती
एकीकडे ऋषभ पंतचे लाखो चाहते त्याच्या लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी शुभेच्छा देत आहेत. दुसरीकडे, त्यांच्या तब्बेतीतील सुधारणांच्या बातम्यांकडे सर्वांच्या नजरा भिडल्या आहेत. मात्र, मॅक्स रुग्णालयाकडून पंतच्या सुधारणेबाबत कोणतेही अधिकृत माहिती दिली जात नाही. त्यामुळे त्याला जे कोणी भेटून येतात, त्यांच्याकडून ऋषभ पंतबाबतची माहिती माध्यमांना मिळते.
अधिक वाचा :